घरCORONA UPDATEjohnson and johnson ने लहान मुलांवरील लसीकरण चाचणीच्या परवानगीसाठी CDSCO कडे केला...

johnson and johnson ने लहान मुलांवरील लसीकरण चाचणीच्या परवानगीसाठी CDSCO कडे केला अर्ज

Subscribe

जागतिक आरोग्य क्षेत्रातील प्रमुख जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीने भारतात १२ ते १७ वयोगटातील मुलांवरील लसीकरण चाचणीच्या परवानगीसाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडे ( CDSCO) कडे अर्ज सादर केला आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल-शॉट लसीने तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्समध्ये गंभीर रोगापासून संरक्षण करण्यासाठी ८५ टक्के परिणामकारकता दर्शविली आहे.

अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने मंगळवारी आपला अर्ज सादर केल्याचे सांगितले. यामुळे लहान मुलांसह त्यावरील वयोगटातील नागरिकांचे कोरोनाविरोधी लसीकरण पूर्ण करणे शक्य होईल. कंपनीने सांगितले की, कोरोनाविरोधी लस सर्व वयोगटातील नागरिकांसाठी समानतेने उपलब्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.भारतात मंजूर होणारी ही पाचवी आणि पहिली सिंगल डोस लस आहे.

- Advertisement -

जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल-शॉट लसीला आपत्कालीन वापरासाठी EUA ने यापूर्वीच परवानगी दिली आहे. तर भारतात हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. कंपनीद्वारे पुरवली जाणार आहे. एका अभ्यासतून दिसून आले की, गंभीर प्रकरणांवर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लस ८५ टक्के प्रभावी ठरतेय.

यातच केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडाविया यांनी गुरुवारी सांगितले की, लहान मुलांसाठी लवकरचं कोरोनाविरोधी लस उपलब्ध होईल. यासाठी भारत बायोटेक आणि झायडस कॅडिलाद्वारे दोन क्लिनिकल चाचण्या आधीच सुरू आहेत. त्यांचे निकाल पुढील महिन्यात येणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -