घरCORONA UPDATEJohnson & Johnson ने भारतात तिसऱ्या टप्प्यातील covid-19 लस चाचणीसाठी मागितली परवानगी

Johnson & Johnson ने भारतात तिसऱ्या टप्प्यातील covid-19 लस चाचणीसाठी मागितली परवानगी

Subscribe

कंपनीने आयात परवान्यासाठी देखील सरकारला विनंती केली आहे.

देशात कोरोना लसीकरण मोहिम वेगाने सुरु असून नागरिकांना सध्या दोन कंपन्यांना लसी देण्यात येत आहे. यामध्ये सीरम संस्थेची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या लसींचा समावेश आहे. तर रशियाच्या स्पुतनिक व्ही कोरोना वॅक्सिनला काही दिवसांपूर्वीच मंजुरी देण्यात आली आहे. यात आता Johnson & Johnson या कंपनीनेही भारतात सिंगल डोस कोरोना वॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी परवानगी मागितली आहे. कंपनीने आयात परवान्यासाठी देखील सरकारला विनंती केली आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भारत सरकारकडून काही दिवसांपूर्वी लसीकरण मोहिम जलद करण्याच्या दृष्टीने पाउले उचलली जात आहेत. यात देशात आपातकालीन वापरासाठी लसींना मंजुरी देण्याची प्रक्रिया अधिक जलद केली आहे.

Johnson & Johnson कंपनीने आपल्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना(सीडीएससीओ) च्या कोविड१९ वर विषेशज्ञ समितीची बैठक बोलण्याची मागणी केली आहे. १२ एप्रिलला कंपनीकडून सुगम या ऑनलाईन पोर्टलमार्फत ग्लोबल क्लिनिकल ट्रायल डिव्हिजनमध्ये अर्ज देण्यात आला. मात्र काही कारणांमुळे Johnson & Johnson कंपनीने सोमवारी पुन्हा अर्ज दाखल केला.

- Advertisement -

Johnson & Johnson कंपनीद्वारे तयार करण्यात आलेल्या कोरोना वॅक्सीनचा केवळ एकच डोस दिला जातो. ही लस २ ते ८ डिग्री सेल्सिअस तापमानात तीन महिन्यापर्यंत ठेवता येत असून शून्य ते २० डिग्री सेल्सिअसहून कमी तापमानातही दोन वर्षे राहू शकते. दरम्यान या लसीचा प्रभाव जगभरात ६६ टक्के आणि अमेरिकेत ७२ टक्क्यांपर्यंत असल्याचे समोर आले आहे. या एका डोसची किंमत जवळपास ६३७ ते ७३० रुपये आहे.

दरम्यान Johnson & Johnson ची लस घेतल्यानंतर रक्तात गाठी तयार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर अमेरिकेने या लसीचा वापर तात्पुरता स्थगित केला होता. इतरही काही देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव लसीचा वापर थांबवला आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -