घर देश-विदेश जोशीमठातील सुमारे ५०० घरांना तडे; प्रशासन अलर्ट मोडवर

जोशीमठातील सुमारे ५०० घरांना तडे; प्रशासन अलर्ट मोडवर

Subscribe

उत्तराखंड येथील बद्रीनाथपासून अवघ्या ५० किमी अंतरावर जोशीमठ आहे. येथील घरांना व भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक येथून स्थलांतरीत होत आहे. येथे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी शुक्रवारी आढावा घेतला. यासाठी अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री धामी यांनी बोलावली होती. 

उत्तराखंडः जोशीमठ शहरातील भिंतींना व रस्त्यांना तडे गेले आहेत. सुमारे ५०० घरांना तडे गेल्याची माहिती आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दुसरीकडे स्थलांतरीत केले जात आहे. त्यावर उपाय म्हणून तेथील राज्य शासनाने धोकादायक घरात राहणाऱ्या नागरिकांना सहा महिन्याचे भाडे देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रति महिना ४ हजार रुपये येथील नागरिकांना दिले जाणार आहेत.

उत्तराखंड येथील बद्रीनाथपासून अवघ्या ५० किमी अंतरावर जोशीमठ शहर आहे. येथील घरांना व भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक येथून स्थलांतरीत होत आहेत. येथे उद्भवलेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी शुक्रवारी आढावा घेतला. यासाठी अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री धामी यांनी बोलावली होती.

- Advertisement -

आढावा बैठकीत मुख्यमंत्री धामी यांनी जोशीमठ येथील नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत काही सुचना केल्या. जोशीमठ येथील नागरिकांसाठी सुरक्षित ठिकाणी तात्पूरते पुनर्वसन केंद्र उभारावे, असे मुख्यमंत्री धामी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. जोशीमठ परिसरातील जो भाग धोकादायक आहे त्याची तत्काळ माहिती घ्यावी. तेथील नागरिकांना तत्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करावे. तेथे आपत्ती नियंत्रण कक्ष उभारावे, अशा सुचना मुख्यमंत्री धामी यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

या बैठकीत जोशीमठातील नागरिकांना सहा महिने घरभाडे देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. ज्या नागरिकांची घरे धोकादायक आहेत किंवा राहण्याजोगी नाहीत. अशा नागरिकांना सहा महिन्याचे घरभाडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा नागरिकांना प्रति महिना चार हजार रुपये घरभाडे दिले जाणार आहे.

- Advertisement -

या बैठकीनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांंनी तत्काळ कार्यवाही सुरु केली आहे. जोशीमठ परिसरातील धोकादायक जागांचा आढावा घेण्यात येत आहेत. आतापर्यंतच्या पाहाणीत येथील ५०० हून अधिक घरांना तडे गेल्याची माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व स्थानिक आपत्ती निवारण पथक परिस्थितीचा आढावा घेत आहे. येथील विविध प्रशासकीय कामेही तत्काळ थांबवण्यात आली आहेत. पुढील आदेश येईपर्यंत प्रशासकीय कामांना स्थगिती राहणार आहे. नागरिकांनी घाबरु नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -