घरदेश-विदेशजोशीमठाबाबत ISRO चा धक्कादायक खुलासा; अवघ्या 12 दिवसांत जमीन 5.4 सेमीने खचली

जोशीमठाबाबत ISRO चा धक्कादायक खुलासा; अवघ्या 12 दिवसांत जमीन 5.4 सेमीने खचली

Subscribe

जोशीमठाबाबत आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनेही एक मोठा खुलासा केला आहे. जोशीमठ गाव अवघ्या 12 दिवसांत 5.4 सेमीने धसत असल्याचा धक्कादायक खुलासा ISRO च्या अहवालातून झाला आहे. सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून हा खुलासा केला आहे. या अहवालानुसार, जोशीमठ गाव 27 डिसेंबर ते 8 जानेवारी 2023 दरम्यान 5.4 सेमीने धसले आहे. यापूर्वी एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान जोशीमठ 9 सेंटीमीटरने धसल्याचे दिसून आले. या घटनांना 2 जानेवारी 2022 रोजीपासून सुरुवात झाल्याचे नमूद आहे.

ISRO च्या माहितीनुसार, एप्रिल ते नोव्हेंबर 2022 दरम्यान जमीन खचण्याचं प्रमाण खूप कमी होतं. यावेळी जोशीमठ नऊ सेंटीमीटने खचला होता. जोशीमठ हा औली रस्ताजवळून 2180 मीटर उंचावर आहे. मात्र हा रस्ताही आता खचत असल्याची माहिती समोर येत आहे. कार्टोसॅट 2 एस उपग्रहाने काढलेल्या फोटोंत इस्त्रोने जोशीमठामधील लष्करी हेलिपॅड आणि नरसिंह मंदिरासग संपूर्ण शहाराला संवेदनशील क्षेत्र म्हणून चिन्हांकित केलं आहे. ISRO सह नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर म्हणजेच NSRC नेही याबाबत अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, जोशीमठ दरवर्षी 662 सेमी म्हणजे सुमारे 2. 60 इंचने खचत आहे. NSRC डेहराडूनच्या शास्त्रज्ञांनी जुलै 2022 ते मार्च 2022 या कालावधीत जोशीमठ आणि आसपासचा परिसर सुमारे सहा किलोमीटरच्या सॅटेलाईट ईमेजचा अभ्यास केला आहे.

- Advertisement -

दरम्यान जोशीमठच्या घरांना तडे गेल्याने लोकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या घटनेवर प्रशासनाने अभियंता आणि अधिकाऱ्यांच्या 5 सदस्यीय पथकाद्वारे तड्यांची तपासणी केली, यानंतर जोशीमठच्या घरांचे तडे वाढतच गेले, परिस्थिती चिघळली तेव्हा राज्य आणि केंद्र सरकारने त्याची दखल घेतली. नागरिकांना घरं खाली करण्याच्या सुचना केल्या आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -