घरदेश-विदेशजवानाच्या सुटकेसाठी ‘बस्तर का पत्रकार’ धावून आला!

जवानाच्या सुटकेसाठी ‘बस्तर का पत्रकार’ धावून आला!

Subscribe

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सीआरपीएफच्या जवान आणि नक्षलवादी यांच्यात गेल्या आठवड्यात जोरदार चकमक झाली होती आणि यात 22 सैनिक शहीद झाले. या चमकीदरम्यान नक्षलवाद्यांनी सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंग मनहास यांचे अपहरण केले होते. त्यानंतर नक्षलवाद्यांनी राकेश्वर यांची तब्बल 100 तासांनी सुटका केली. या सुटकेत मुकेश चंद्रकर या पत्रकाराने मोलाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. मुकेश यांच्या बहादूर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. नक्षलवादी परिसरात मुकेशची ओळख ‘बस्तर का पत्रकार’ म्हणून आहे.

राज्य सरकार चर्चेसाठी मध्यस्थ करणार असल्याचे जाहीर केल्यानंतरच सीआरपीएफ कमांडो राकेश्वर यांना सोडण्यात येणार असल्याचे नक्षलवाद्यांनी सांगितले होते. मात्र, राकेश्वर यांच्या सुटकेमागील रहस्य छत्तीसगड सरकारने सांगितले आहे. छत्तीसगडमधील एका अधिकार्‍याने याबद्दल माहिती दिली. ‘आदिवासी समुदायाच्या एका व्यक्तीसोबत दोन प्रतिष्ठित लोकांच्या टीमसह गावातील अनेक लोकांच्या उपस्थितीत जवान राकेश्वर यांना नक्षलवाद्यांनी सोडले. छत्तीसगड सरकारने जी टीम पाठवली होती, त्यामध्ये एका ९१ वर्षांच्या व्यक्तीचा देखील समावेश असूनही व्यक्ती स्वातंत्र्य सेनानी आहे. त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे’. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीचे नाव धरमपाल सैनी असे आहे.

- Advertisement -

धरमपाल सैनी एक समाजसेवकसुद्धा आहेत आणि त्या भागातील मुलींना ते शिक्षण देण्याचे काम करतात. याव्यतिरिक्त सरकारकडून मध्यस्थीसाठी पाठवलेल्या टीममध्ये गोंडवाना समाजाचे अध्यक्ष तेलम बोरैया, 7 पत्रकार आणि दोन अधिकार्‍यांचासुद्धा समावेश होता.या टीमच्या मध्यस्थीनंतर नक्षलवाद्यांनी राकेश्वर यांची सुटका केली. राकेश्वर यांचे अपहरण केल्यानंतर बस्तर येथील एका पत्रकाराला म्हणजे मुकेश चंद्रकर याला फोनवरून नक्षलवाद्यांनी जवान आमच्या ताब्यात असल्याचे कळवले होते. तेव्हापासून जवानाची सुटका होईपर्यंत मुकेश यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे जवानाच्या सुटकेसाठी स्वत: पत्रकार नक्षलवाद्यांच्या छावणीत गेले होते, अशी माहिती समोर आली. नक्षलवाद्यांच्या तावडीतील जवानाला सुखरुप कॅम्पमध्ये पोहोचविण्यासाठी मुकेशला बस्तर येथील स्थानिक पत्रकारांची देखील चांगली साथ मिळाली.

‘बस्तर का पत्रकार’ या नावाने मुकेश चंद्रकर हा ओळखला जातो. मुकेश यांच्यासह त्यांचे काही सहकारी मित्र नक्षलवाद्यांच्या छावणीत गेल्यानंतर नलक्षवाद्याच्या म्होरक्याशी संवाद साधून त्यांनी राकेश्वर यांची सुटका केली. त्यानंतर,आपल्या स्वत:च्या दुचाकीवरून राकेश्वर सिंह यांना सुखरुप कॅम्पमध्ये पोहोचविण्यात आले. बहाद्दर पत्रकार मुकेश चंद्रकर यांच्या या कामगिरीचे सोशल मीडियावर सुद्धा कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -