मी टू चळवळी अंतर्गत पत्रकार प्रिया रमानी यांनी माजी केंद्रीय मंत्री एम.जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. या आरोपामुळे एम. जे अकबर यांनी परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामी द्यावा लागला होता. पण त्यानंतर एम.जे अकबर यांनी पत्रकारह प्रिया रमानी यांच्या विरोधात वैयक्तिक अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणाबाबत आज दिल्ली कोर्टाने प्रिया रमानी यांची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे दिल्ली कोर्टाच्या निकालामुळे मंत्री एम.जे. अकबर यांना जोरदार झटका बसला असून प्रिया रमानी यांना दिलासा मिळाला आहे.
Delhi Court acquits journalist Priya Ramani in criminal defamation case filed by former Union Minister MJ Akbar against her pic.twitter.com/Uv23xiESuQ
— ANI (@ANI) February 17, 2021
एम.जे. अकबर यांनी प्रिया रमानी यांनी हे जाणीवपूर्वक आणि चुकीच्या भावनेने आरोप केले असल्याचे म्हटले होते. तसेच प्रिया रमानी यांच्या विरोधात करनजावाला अँड कंपनी या लॉ फर्मच्याद्वारे पटियाला हाऊस कोर्टात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली होती. याच प्रकरणी आज (१७ फेब्रुवारी) दिल्ली कोर्टाने निकाल देताना माजी केंद्रीय मंत्री एम.जे.अकबर यांची केलेला मानहानी दावा फेटाळला आहे. तर पत्रकार प्रिया रमानी यांना मानहानीसाठी दोषी नसल्याचे सांगितले आहे.
याप्रकरणाची सुनावणी करताना दिल्ली कोर्ट म्हणाले की, ‘कितीही दशकांनंनरही महिलेला आपली तक्रार करण्याचा अधिकार आहे.’ पण लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करण्यासाठी योग्य यंत्रणेची कमी असल्याची खंत देखील यावेळी कोर्टाने व्यक्त केली आहे.
हेही वाचा – राजदीप सरदेसाईंवर कारवाई नाही, सुप्रीम कोर्टाचे स्पष्टीकरण