घरताज्या घडामोडीवृत्तवाहिनीच्या पत्रकाराची गोळ्या घालून हत्या

वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची गोळ्या घालून हत्या

Subscribe

एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील फेफना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. सोमवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रतन कुमार सिंह (४२) असे त्यांचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या हत्याकांडानंतर उत्तर प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार; ‘वाद झाल्यानंतर काही जणांनी पत्रकार रतन सिंह यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली’. याप्रकरणी पोलीस पथक या घटनेचा तपास करीत आहेत.

- Advertisement -

आझमगढचे पोलीस महानिरीक्षक सुभाषचंद्र दुबे यांनी सांगितले की, ‘या प्रकरणात तीन प्रमुख आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. रतन सिंह हे पत्रकार होते. मात्र, या घटनेचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे’.

पोलीस प्रमुखांना निलंबित करा

या घटनेनंतर पत्रकारांनी कुटुंबीयांसह धरणे केली आहेत. एनएच ३१ वर त्यांनी धरणे केली असून पोलीस ठाण्याच्या प्रमुखांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. तर पोलीस ठाण्याचे प्रमुख शशिमौली पांडेय यांना पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक! ७ वर्षाच्या मुलाने चिरला चार वर्षाच्या चिमुरड्याचा गळा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -