घरताज्या घडामोडीPunjab Assembly Election 2022 : पंजाबमध्ये भाजप ६५ जागांवर लढणार, जेपी नड्डांची...

Punjab Assembly Election 2022 : पंजाबमध्ये भाजप ६५ जागांवर लढणार, जेपी नड्डांची मोठी घोषणा

Subscribe

पंजाबमध्ये भाजप, कॅप्टन आणि धिंडसा यांचा पक्षातील जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. भारतीय जनता पक्षाने पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग यांची पंजाब लोक काँग्रेस आणि सुखदेव धिंडसा यांच्या संयुक्त अकाली दल या पक्षांशी युती केली असून युतीचे जागा वाटप निश्चित झाल्याची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी दिली आहे. पंजाबमध्ये भाजप ६५ जागा लढणार असून पंजाब लोक काँग्रेसचे प्रमुख ३७ जागांवर लढणार आहेत. तसेच एसएडी-संयुक्त प्रमुख १५ जागांवर निवडणूक लढणार असल्याची घोषणा जेपी नड्डा यांनी केली आहे.

११७ पैकी ७१ जागांसाठी उमेदवार जाहीर

या आघाडीने ११७ पैकी ७१ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. पंजाबमध्ये उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. पंजाब हे राज्य पाकिस्तानच्या सीमेलगत असलेले राज्य असल्याने येथे सुरक्षा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यात राष्ट्रीय विचारांचे सरकार असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी आमची आघाडी निश्चीतपणे पार पाडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध चांगले असणे आवश्यक

पंजाबमधील सुरक्षितता आणि स्थैर्यासाठी केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध चांगले असणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पंजाबशी एक वेगळचं नात आहे. दुसरीकडे त्यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराची घोषणा देखील केली आहे.
पंजाबमधील ड्रग्ज, वाळू आणि भूमाफिया संपवणार असल्याचे जेपी नड्डा यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मी पंजाबमध्ये साडेचार वर्ष मुख्यमंत्री होतो. याचदरम्यान एक हजार रायफल, ५०० पिस्तूल, आरडीएक्स आणि दारूगोळा सापडला. हे ड्रोनद्वारे काही विशिष्ट ठिकाणी ड्ऱॉप करण्यात आले होते. २० जुलैपर्यंत ३१ किमीपर्यंत ड्रोनद्वारे शस्त्रे आणि ड्रग्जची डिव्हिलरी करण्यात येत होती, असं कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : PMRBP Awareeds : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारात महाराष्ट्राचा झेंडा ! विजेत्यांमध्ये राज्यातील तीन मुलांचा समावेश


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -