Saturday, March 15, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशSajjan Kumar : सज्जन कुमारांना फाशीऐवजी जन्मठेप का? न्यायाधिशांनी सांगितले कारण

Sajjan Kumar : सज्जन कुमारांना फाशीऐवजी जन्मठेप का? न्यायाधिशांनी सांगितले कारण

Subscribe

सज्जन कुमार यांना मृत्यूदंडाची शिक्षा न देता जन्मठेप का देण्यात येत आहे, याचे कारण सांगत विशेष न्यायाधीश कावेरी बवेजा यांनी सांगितले की, सज्जन कुमार यांनी केलेला गुन्हा हा क्रूर आणि निंदनीय होता. परंतु त्यांचे वृद्धापकाळ आणि आजार लक्षात घेता, त्यांना मृत्युदंडापेक्षा कमी कठोर शिक्षा देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात 1 नोव्हेंबर 1984 ला मोठी दंगल उसळली. याचे सर्वाधिक परिणाम हे दिल्लीत पाहायला मिळाले. या दंगलीला भडकावण्याचे काम काँग्रेस नेते, माजी खासदार सज्जन कुमार यांनी केले होते. या प्रकरणी अखेर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 1984 च्या शीखविरोधी दंगलीदरम्यान जसवंत सिंह आणि त्यांचा मुलगा तरुणदीप यांना जिवंत जाळण्यात आले होते. या प्रकरणाचा निकाल तब्बल 41 वर्षानंतर लागला आहे. मात्र, या प्रकरणी सज्जन कुमारांना फाशीची शिक्षा द्यायला हवी होती, अशी मागणी शीख समुदायाकडून करण्यात येत आहे. पण सज्जन कुमारांना जन्मठेपेची शिक्षाच का देण्यात आली आहे, याचे कारण न्यायाधीशांनी सांगितले आहे. (judge said to give life imprisonment to Sajjan Kumar instead of death) सज्जन कुमार यांना मृत्यूदंडाची शिक्षा न देता जन्मठेप का देण्यात येत आहे, याचे कारण सांगत विशेष न्यायाधीश कावेरी बवेजा यांनी सांगितले की, सज्जन कुमार यांनी केलेला गुन्हा हा क्रूर आणि निंदनीय होता. परंतु त्यांचे वृद्धापकाळ आणि आजार लक्षात घेता, त्यांना मृत्युदंडापेक्षा कमी कठोर शिक्षा देण्यात आली आहे. याशिवाय, न्यायालयाने हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ मानला नाही. तुरुंग अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार, दोषी सज्जन कुमार यांचे वर्तन समाधानकारक होते आणि त्यांच्या वर्तनाबाबत कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही. हे प्रकरण त्याच घटनेचा भाग आहे ज्यासाठी 17 डिसेंबर 2018 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या दंगलीत पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी उच्च न्यायालयाने कुमार यांना दोषी ठरवले होते. हेही वाचा… Sajjan Kumar : संजय गांधींचे निकटवर्ती ते खासदार, असा होता सज्जन कुमारांचा राजकीय प्रवास तर, न्यायमूर्ती बवेजा म्हणाल्या की, या प्रकरणात दोन निष्पाप व्यक्तींची हत्या करणे हा निःसंशयपणे गंभीर गुन्हा आहे, परंतु न्यायालयाच्या मते वरील परिस्थितीमुळे तो दुर्मिळातील दुर्मिळ खटला बनत नाही. ज्यासाठी गुन्हेगाराला मृत्युदंड देणे योग्य आहे. मात्र, पीडित कुटुंबीयांनी शिक्षेवर संताप व्यक्त करत त्याने मृत्युदंडाची मागणी केली आहे. तुरुंगातून आलेल्या अहवालाचा दाखला देत कोर्टाने सांगितले की, प्रकृती अस्वस्थामुळे सज्जन कुमार हे आपले दैनंदिन काम सुद्धा नीट करू शकत नाही. न्यायालयाने कुमार यांना सुमारे 2.40 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाने कुमारच्या सर्व शिक्षा एकाच वेळी बजावण्याचे आदेश दिले. परंतु, शीखविरोधी दंगली प्रकरणात सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयावर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने नाराजी व्यक्त केली आहे. सज्जन कुमारसारख्या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आलेली नाही. त्याला मृत्युदंडाची शिक्षा झाली असती तर बरे झाले असते, असे या समितीचे सरचिटणीस जगदीप सिंह यांनी सांगितले.