Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश राहुल गांधींची शिक्षा कायम ठेवणाऱ्या न्यायाधीशींची झाली बदली, काय आहे प्रकरण?

राहुल गांधींची शिक्षा कायम ठेवणाऱ्या न्यायाधीशींची झाली बदली, काय आहे प्रकरण?

Subscribe

राहुल गांधींची शिक्षा ज्या गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कायम ठेवली होती तेथील न्यायाधीशांची आता बदली करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत एम प्रच्छक सर्वोच्च न्यायालयानेच बदली केली आहे.

नवी दिल्ली : मोदी आडनावावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुरत जिल्हा सत्र न्यायालयाकडून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे पुढील दोन वर्षांसाठी राहुल गांधी यांना अपात्र घोषित करत त्यांचे खासदारकीपद रद्द करण्यात आले होते. ज्यानंतर राहुल गांधी यांनी सुरत न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेला गुजरात न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर राहुल गांधीनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी (ता. 04 ऑगस्ट) निकाल देत राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. पण राहुल गांधींची शिक्षा ज्या गुजरात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कायम ठेवली होती तेथील न्यायाधीशांची आता बदली करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हेमंत एम प्रच्छक सर्वोच्च न्यायालयानेच बदली केली आहे. (judge who upheld Rahul Gandhi’s sentence was transferred)

हेही वाचा – ‘तुम्ही परत याल तर पंतप्रधान बनूनच या’; राहुल गांधींना ‘कोणत्या’ गावातील लोकांनी म्हटले असे,वाचा-

- Advertisement -

न्यायमूर्ती हेमंत एम. प्रच्छक यांच्याशिवाय न्यायमूर्ती अल्पेश वैन कोगजे, न्यायमूर्ती कुमारी गीता गोपी आणि गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती समीर जे. दवे यांचीही सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने बदली केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार प्रच्छक यांची पाटना उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे.

गुजरातमधील पोरबंदर येथे जन्मलेले हेमंत प्रच्छक हे 18 ऑक्टोबर 2021 रोजी गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पदी कार्यरत झाले. त्यानंतर 2015 ते 2019 या काळात त्यांनी केंद्र सरकारचे स्थायी समुपदेशक म्हणून काम केले. या कामानंतर त्यांना बढती देऊन गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बनविले गेले. मोदी आडनाव प्रकरणी राहुल गांधी यांच्या खटल्याची सुनावणी केल्यानंतर ते सर्वाधिक चर्चेत आलेले न्यायमुर्ती होते. काहीच दिवसांपूर्वी याच न्यायाधीशांकडून देण्यात आलेल्या राहुल गांधीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता न्यायमूर्तींची बदली करण्यात आल्यानंतक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

- Advertisement -

सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा करणारे पूर्णेश मोदी म्हणाले होते की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो. पण सत्र न्यायालयात माझा कायदेशीर लढा सुरूच ठेवणार आहे. तर दुसरीकडे मात्र आता उद्या (ता. 08 ऑगस्ट) संसदेत मणिपूरच्या हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सादर करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार आहे आणि या चर्चेत आता राहुल गांधी देखील सहभागी होवू शकणार आहेत.

- Advertisment -