यूपीच्या अवलियाचा अनोखा जुगाड; मारुती कारच्या छतावरच मांडलं दुकान

कोणत्याही समस्येत अडकल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी भारतीय नागरिक सातत्याने जुगाड करताना पाहायला मिळते. जुगाड हे भारतीय लोकांच्या सर्वात प्रसिद्ध कौशल्यांपैकी एक आहे. नुकतंच एका उत्तर प्रदेशातील व्यक्तीने स्वताच्या कारचे दुकानामध्ये रुपातर केले आहे.

कोणत्याही समस्येत अडकल्यास त्यातून बाहेर पडण्यासाठी भारतीय नागरिक सातत्याने जुगाड करताना पाहायला मिळते. जुगाड हे भारतीय लोकांच्या सर्वात प्रसिद्ध कौशल्यांपैकी एक आहे. नुकतंच एका उत्तर प्रदेशातील व्यक्तीने स्वताच्या कारचे दुकानामध्ये रुपातर केले आहे. त्यानुसार, त्याने मारुती 800 या गाडीचे छत कापून दुकान बनवले आहे. गाडीवरील या दुकानाचा फोटो आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (jugaad for shop man made shop on maruti car roof shop desi man-unique jugaad video viral)

आयपीएस अधिकारी पंकज नैन यांनी ट्विटरवर शेअर केले असून, त्याला कॅप्शनमध्ये दिले की, ‘हे खूपच नाविन्यपूर्ण आहे’. एका फेसबुक युजरने हा फोटो शेअर करत लिहिले की, ‘भारतीय जुगाड, अतिक्रमणाची भीती नाही, जागेचे टेन्शन नाही. आमचे लखनऊ’. काहींनी याला फिरते पान शॉप असून, असा जुगाड यापूर्वी कधीच पाहिला नसल्याचे काहींनी सांगितले.

गाडीवरील या अनोख्या दुकानाचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. @MANAVSINGH_IND या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने ‘मारुती 800’ कारच्या छतावर दुकान बनवल्याचे पाहायला मिळते.


हेही वाचा – गौतमी पाटीलच्या डान्सवर आवर घाला अन्यथा गृहमंत्रालय कार्यालयाच्या काचा फोडू; मनसेचा इशारा