संसदेत आता जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, जयचंद अशा डझनभर शब्दांवर बंदी; पाहा पूर्ण लिस्ट

काही शब्द आणि वाक्प्रचार देशाच्या विविध विधानसभांमध्ये सभापतींकडून वेळोवेळी असंसदीय म्हणून घोषित केले जातात

jumlajeevi nikamma tanashah ashamed jaichand corona spreader many more to be unparliamentary in lok sabha rajya sabha see list

संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये शब्दांच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द 2021 या शीर्षकाखाली काही शब्द आणि वाक्यांची यादी तयार केली आहे. ज्यांना असंसदीय अभिव्यक्ती या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत दोन्ही सभागृहांच्या कामकाजात भाग घेणारे खासदार चर्चेदरम्यान जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, विनाश पुरुष, खलिस्तानी, जयचंद आणि भ्रष्ट अशा शब्दांचा वापर करु शकत नाहीत.

लोकसभा आणि राज्यसभेच्या 18 जुलैपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा नियम लागू केला जाणार आहे. या शब्दांशिवाय संसदेत टार्गेट करण्यासाठी वापरण्यात येणारी चाइल्ड इंटेलिजन्स, स्नूपगेट, बालबुद्धी या शब्दांच्या वापरावरही बंदी घालण्यात येणार आहे.

शर्म, दुर्व्यवहार, विश्वासघात, ड्रामा, पाखंड आणि अक्षम असे सर्रास वापरले जाणारे शब्दही आता लोकसभा आणि राज्यसभेत असंसदीय मानले जातील. या शब्दांशिवाय शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकडी, गुल खिलाए, पिट्ठू आदी शब्दही दोन्ही सभागृहात वापरले जाणार नाहीत. लोकसभा सचिवालयाने जारी केलेल्या नवीन पुस्तिकेनुसार, अशा शब्दांचा वापर “बेकायदेशीर आचरण” मानला जाईल आणि सभागृहाच्या कामकाजाचा भाग होणार नाही.

यानुसार, असंसदीय शब्द, वाक्ये किंवा अशोभनीय अभिव्यक्ती या श्रेणीतील शब्दांमध्ये कमीना, काला सत्र, दलाल, खून की खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौटंकी, ढिंढोरा पीटना, बहरी सरकार, चिलम लेना, छोकरा, कोयला चोर, गोरू चोर, चरस पीते हैं, सांड, तानाशाही, तानाशाह, अराजकतावादी, गद्दार, अपमान, गिरगिट, गूंस, घड़ियाली आंसू, असत्य, गद्दार, करप्ट, अहंकार, काला दिन, काला बाजारी, खरीद फरोख्त, दंगा, दलाल, दादागीरी, बेचारा, बहरी सरकार, संवेदनहीन, बॉबकट, विश्वासघात लॉलीपॉप, सेक्सअल हरेसमेंट शब्द देखील समाविष्ट केले आहेत.

सभापती आणि अध्यक्ष खंडपीठावरील आरोपांबाबत अनेक वाक्येही असंसदीय श्रेणीत ठेवण्यात आली आहेत. यामध्ये आप मेरा समय खराब कर रहे हैं, आप हम लोगों का गला घोंट दीजिए, चेयर को कमजोर कर दिया है और यह चेयर अपने सदस्यों का संरक्षण नहीं कर पा रही है, इत्यादीचा समावेश आहे. जर एखाद्या संसद सदस्य आक्षेप म्हणाला की, जब आप इस तरह से चिल्ला कर वेल में जाते थे, उस वक्त को याद करूं या आज जब आप इस आसन पर बैठें हैं तो इस वक्त को याद करूं.. या गोष्टींना देखील असंसदीय मानून रेकॉर्डचा भाग मानला जाणार नाही.

याशिवाय bloodshed, bloody, betrayed, ashamed, abused, cheated,chamcha, chamchagiri, chelas, childishness, corrupt, coward, criminal, crocodile tears, disgrace, donkey, drama, eyewash, fudge, hooliganism, hypocrisy, incompetent, mislead, lie, untrue अशा इंग्रजी शब्दांचा वापर देखील असंसदीय मानला जाईल.

काही शब्द आणि वाक्प्रचार देशाच्या विविध विधानसभांमध्ये सभापतींकडून वेळोवेळी असंसदीय म्हणून घोषित केले जातात. या शब्दांची यादी लोकसभा सचिवालयाकडून संदर्भासाठी संकलित केली आहे. हे शब्द आणि वाक्प्रचार सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याचे अंतिम अधिकार राज्यसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेच्या सभापतींना असतील. या यादीत असे म्हटले आहे की, संसदीय कामकाजादरम्यान काही शब्द जोपर्यंत इतर संबोधनांसोबत पाहिले जात नाहीत तोपर्यंत ते असंसदीय वाटत नाहीत.

लोकसभेतील कामकाजासाठीचा नियम 381 काय सांगतो?

लोकसभेतील कामकाजाच्या नियम 381 नुसार, जर सभापतींना चर्चेदरम्यान अपमानास्पद किंवा असंसदीय किंवा असभ्य किंवा असंवेदनशील शब्द वापरले गेले आहेत असे वाटत असेल तर ते काढून टाकण्याचे आदेश देऊ शकतात. त्याच वेळी, नियम 381 नुसार, सभागृहाच्या कामकाजाचा जो भाग काढून टाकायचा आहे त्यावर चिन्हांकित केल्यानंतर कार्यवाहीमध्ये एक टीप अशा प्रकारे घातली जाते की ती सभापतींच्या आदेशानुसार काढली गेली.


द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देऊनही शिवसेना दुर्लक्षितच, आजच्या मुंबईतील बैठकीचे निमंत्रण नाही