नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन हे सातत्याने मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर आकडेवारीनिशी भाष्य करताना दिसत आहेत. त्यांनी नुकतेच चीप उत्पादन प्रकल्पासाठीच्या अनुदान योजनेला मान्यता देण्याच्या धोरणावर टीका केली आहे. विकसित देश होण्यासाठी हा नक्कीच योग्य मार्ग नाही. चिप उत्पादन क्षेत्रात उडी मारणे घातक ठरेल, असे परखड मत मांडले आहे. (Jumping into chip manufacturing would be risky Raghuram Rajan spoke clearly)
हेही वाचा – Prasad Lad : …तर संजय तुला सोडणार नाही; राऊतांचा एकेरी उल्लेख करत प्रसाद लाड आक्रमक
अलिकडेच ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत रघुराम राजन यांनी म्हटले होते की, शिक्षण प्रणाली सुधारण्याऐवजी भारत चिप उत्पादनासारख्या उच्च प्रोफाइल प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला होता. असे असतानाही त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. रघुराम राजन म्हणाले की,उच्च शिक्षणासाठी वार्षिक बजेटपेक्षा चिप उत्पादनासाठी अनुदानावर अधिक खर्च करण्याचे भारताचे धोरण योग्य नाही. विकसित देश होण्यासाठी हा नक्कीच योग्य मार्ग नाही. भारताने कधीही चिप उत्पादन क्षेत्रात येऊ नये. प्रत्येक देश चिप उत्पादन क्षेत्रात प्रयत्न करतो. त्यामुळे आपणही चिप उत्पादन क्षेत्रात उडी मारणे घातक ठरेल.
गेल्या महिन्यात, भारताने त्याच्या 76 हजार कोटी ($10 अब्ज) चिप सबसिडी योजनेअंतर्गत 3 सेमीकंडक्टर प्लांटला मान्यता दिली आहे. या तिन्ही सुविधांमध्ये एकूण 1.26 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपैकी अंदाजे 48 हजार कोटी रुपये ($5.8 अब्ज) केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिले जाणार आहेत. मात्र सरकारच्या अनुदान योजनेला मान्यता देण्याच्या धोरणावर टीका करताना रघुराम राजन म्हणाले की, प्रत्यक्षात चिप सबसिडी म्हणजे भांडवली सबसिडी असेल. ती आगाऊ भरावी लागेल आणि उत्पादनावर आधारित नसेल.
हेही वाचा – Ashish Shelar : आधी त्यांनी युद्धाला तलवार उचलली होती…, ठाकरे गटावर आशिष शेलारांचा निशाणा
चिप उत्पादक कारखान्यांच्या अनेक पिढ्यांना सबसिडी द्यावी लागेल
भारत लवकरच चिप्सचे उत्पादन करेल आणि त्यामुळे भांडवली सबसिडी वाढेल असा सरकारचा विश्वास आहे. जर सर्व काही ठीक झाले तर परिणामी 28nm चिप्स असतील. आधुनिक सेल फोनमध्ये 3 एनएमची अल्ट्रा-मॉडर्न चिप असते. जर भारताला जागतिक चिप उत्पादक बनायचे असेल, तर हे लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला चिप कारखान्यांच्या अनेक पिढ्यांना सबसिडी द्यावी लागेल आणि सबसिडीचा आकार वाढतच जाईल. कारण आधुनिक चिप्स निर्मिती तंत्रज्ञान खूप महाग आहे, असा दावा रघुराम राजन यांनी केला.