पाटणा – महाराष्ट्रात सध्या महायुती सरकारमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु असल्याची चर्चा आहे. प्रत्येकच मंत्र्यांना वाटत आहे की, मी मोदी आणि शहांचा लाडका आहे. त्या थाटातच मंत्री राज्यात वावरत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लाडका मुख्यमंत्री कोण, हे त्यांनी स्वतःच आज सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील भागलपूर येथून देशातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये 22 हजार कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 19वा हप्ता आज वितरीत करण्यात आला. देशातील जवळपास 9.80 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आली. भागलपूर येथे किसान सन्मान निधीचा सहावा वर्धापन दिनही साजरा करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना ‘लाडका मुख्यमंत्री’ म्हणून संबोधित केले. त्याचेवळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला.
उत्तरप्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्याबद्दल बोलताना पंतप्रधान मोदी लालू यादव यांचा नामोल्लेख टाळत म्हणाले की, प्रयागराज येथे कुंभमेळा सुरु आहे. मात्र काही ‘जंगलराज’वाले लोक कुंभमेळ्याबद्दल अपशब्द बोलत आहेत. राम मंदिरावर चिडणारे लोक कुंभमेळ्यासंदर्भात अपशब्द बोलण्याची एकही संधी सोडत नाही. कुंभमेळ्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांना बिहार कधीही माफ करणार नाही.
NDA सरकार ना होती, तो बिहार सहित देशभर के मेरे किसान भाई-बहनों को पीएम किसान सम्मान निधि ना मिलती। बीते 6 साल में इसका एक-एक पैसा सीधे हमारे अन्नदाताओं के खाते में पहुंचा है। pic.twitter.com/kkKbB7gEmz
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2025
कुंभमेळ्याबद्दल काय म्हणाले होते लालू प्रसाद यादव?
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर कुंभला जाणाऱ्या भाविकांची चेंगराचेंगरी झाली, यात 18 लोकांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला. या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना 16 फेब्रुवारी रोजी माजी रेल्वे मंत्री लालू यादव म्हणाले होते की, रेल्वेच्या गैरकारभारामुळे चेंगराचेंगरी झाली आणि इतके लोक मृत्यूमुखी पडले. याची जबाबदारी घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राजीनाम द्यावा. कुंभमेळ्याबद्दल लालू यादव म्हणाले की, अरे, कुंभ, कुंभ वगैरे काही नाही. कुंभ मेळ्याला काही अर्थ नाही. फालतू आहे कुंभ.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांना 19वा हप्ता
भागलपूर येथे शेतकऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी लाल किल्ल्यावरुन म्हणालो होतो की, विकसित भारताचे चार मुख्य स्तंभ आहेत. हे आधारस्तंभ म्हणजे, गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण.एनडीचे सरकार हे शेतकऱ्याचे कल्याणासाठी आहे. तीच आमची प्राथमिकता आहे.
हेही वाचा : Devendra Fadnavis: पंतप्रधान किसान सन्मान निधी आता होणार 15 हजार; देवेंद्र फडणवीसांची घोषणा