घरताज्या घडामोडीनुतालपति वेंकट रमण भारताचे नवे सरन्यायाधीश; १६ महिन्यांचा असणार कार्यकाळ

नुतालपति वेंकट रमण भारताचे नवे सरन्यायाधीश; १६ महिन्यांचा असणार कार्यकाळ

Subscribe

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रमण यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली.

नुतालपति वेंकट रमण यांनी शनिवारी भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. शनिवारी सकाळी ११ वाजता झालेल्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ २३ एप्रिलला म्हणजेच शुक्रवारी (काल) संपला. त्यामुळे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून रमण नियुक्ती करण्यात आली आहे. शरद बोबडे यांनी रमण यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली होती. शनिवारी झालेल्या शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आदी उपस्थित होते.

१६ महिने सरन्यायाधीशपदी

६४ वर्षीय रमण यांचा सरन्यायाधीश म्हणून कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ पर्यंत असणार आहे. ते १६ महिने सरन्यायाधीशपदी असणार आहेत. माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यानंतर सुप्रीम कोर्टात रमण दुसरे सर्वात वरिष्ठ होते. रमण हे आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश आहेत, जे सरन्यायाधीश या पदावर गेले आहेत. त्यांनी २४ एप्रिलला सरन्यायाधीशपदाची शपथ घेतली असून पुढील १६ महिने या पदावर असणार आहेत.

- Advertisement -

१९८३ पासून वकिलीला सुरूवात

२७ जून २००० साली रमण यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ या कालावधीत त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पदाचे काम पाहिले. रमण यांनी १० फेब्रुवारी १९८३ पासून आपल्याला वकिलीला सुरूवात केली. रमण यांनी संविधान, फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केले आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -