घरट्रेंडिंगन्या. रंजन गोगोई: देशाचे ४६ वे सरन्यायाधीश

न्या. रंजन गोगोई: देशाचे ४६ वे सरन्यायाधीश

Subscribe

न्यायमूर्ती रंजन गोगोई यांनी राष्ट्रपती भवन येथे भारताचे मुख्य न्यायाधीश (CJI) म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. गोगोई हे भारताचे ४६ वे सरन्यायाधीश झाले आहेत. याआधीचे सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांचा कार्यकाळ २ ऑक्टोबर २०१८ रोजी समाप्त झाला असून आजपासून रंजन गोगोई सरन्यायाधीश पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत. माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनीच केंद्र सरकारच्या विधी मंत्रालयाकडे रंजन यांच्या नावाची शिफारीस केली होती. अर्थात औपचारिकरित्या नाव सुचवण्याचा अधिकार सरन्यायाधीशांना असतो. याच अधिकाराचा वापर करत दीपक मिश्रा यांनी गोगोई यांचे नाव सुचवल्याचे समजते. मंगळवारी गांधी जयंतीनिमित्त सरकारी कामांना सुट्टी असल्याकारणाने आज बुधवारी हा शपथविधी सोहळा पार पडला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -