घरदेश-विदेशमहाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देणारे न्यायमूर्ती झाले भावूक; म्हणाले, जीना यहॉं, मरना यहॉं..

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देणारे न्यायमूर्ती झाले भावूक; म्हणाले, जीना यहॉं, मरना यहॉं..

Subscribe

 

नवी दिल्लीः महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल देणाऱ्या घटनापीठातील न्या. मुकेशकुमार रसिकभाई शाह हे आज निवृत्त झाले. न्यायालयातील शेवटच्या दिवशी ते भावूक झाले. भावूक होऊन न्या. शाह यांनी ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांचे जीना यहॉं, मरना यहॉं… हे गाणं गायलं.

- Advertisement -

गेल्याच आठवड्यात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शाह, न्या. कृष्णा मुरारी, न्या. हिमा कोहली, न्या. पी. आर. नरसिम्हा यांच्या घटनापीठाने हा निकाल दिला. निकालात पाचही न्यायमूर्तींचे एकमत झाले. कोणत्याही न्यायामूर्तींनी स्वतंत्र निकाल दिला नाही. यातील न्या. शाह हे सोमवारी सेवा निवृत्त झाले.

मी निवृत्त होत नाही. माझी नवीन इनिंग सुरु होत आहे. माझ्या नवीन इनिंगसाठी परमेश्वर मला चांगले आरोग्य देवो. शक्ती देवो, अशी प्रार्थना मी करतो. या प्रसंगी मला राज कपूर यांच्या गाण्याची आठवण होत आहे. कल खेल में हम हो ना हो, गर्दीश में तारे रहेंगे सदा, अशी ओळ म्हणताना  न्या. शाह यांना अश्रू अनावर झाले होते. न्या. शाह निवृत्त झाल्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यासह ३२ झाली आहे.

- Advertisement -

न्या. शाह म्हणाले, मी या समोरापास पात्र आहे की नाही हे मला माहीत नाही. पण या समारोपाचा स्विकार करतो. माझ्या कार्यकाळात कोणी दुखावलं गेलं असेल तर मी त्याची क्षमा मागतो. ईश्वराची पुजा समजून मी माझे काम करत होतो. तुमच्याकडून मिळालेले स्नेह आणि प्रेमाचे मी आभार मानतो.

न्या. शाह यांच्या समारोप भाषणात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी शाह यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. न्या. शाह हे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल होते, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात आले. त्यावेळी आमच्या मैत्रीला वेगळे वळण लागले. कोरोनासारख्या संकटाच्या काळात आम्ही एकत्र बसून काम केले आहे, असे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सांगितले.

सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, न्या. शाह हे नेहमीच आव्हानांना सामोरे जाणारे आहेत. त्यांनी कधीच कामाचा कंटाळा केला नाही. काम नाकारले नाही. कोरोनाकाळात अनेक मुद्दे न्यायालयात आले. ते प्रत्येकवेळी सुनावणीसाठी तयार असायचे. मी एखादा निकाल त्यांच्याकडे पाठवला तर त्याचे विश्लेषण उत्तरासह ते मला रातोरात द्यायचे.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, न्या. शाह हे कर्तृत्त्वान आहेत. त्यांनी दिलेल्या निकालांची संख्या बघता न्या. शाह यांच्या कुटुंबीयांना किती त्रास झाला असेल याचा अंदाज येतो. सेवा निवृत्तीनंतर तरी न्या. शाह यांनी कुटुंबीयांना वेळ द्यावा.

न्या. शाह यांचा जन्म १६ मे १९६८ रोजी झाला. १९ जुलै १०८२ रोजी त्यांनी वकीलीची पदवी घेतली. ७ मार्च २००४ रोजी शाह यांची गुजरात न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २२ जून २००५ रोजी शाह यांना न्यायाधीशपदी कायम करण्यात आले. १२ ऑगस्ट २०१८ रोजी पटना न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शाह यांना बढती मिळाली. २ नोव्हेंबर २०१८ रोजी शाह यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. सोमवारी ते सेवा निवृत्त झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -