घरदेश-विदेशनागपूरचे न्यायमूर्ती शरद बोबडे आज घेणार सरन्यायधीशपदाची शपथ

नागपूरचे न्यायमूर्ती शरद बोबडे आज घेणार सरन्यायधीशपदाची शपथ

Subscribe

न्यायमूर्ती शरद बोबडे आज सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहेत.

न्यायमूर्ती शरद बोबडे आज सरन्यायाधीशपदी विराजमान झाले आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केंद्रीय विधी आणि न्याय मंत्रालयाला पत्र लिहून शिफारस केली. त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब करत आता न्यायमूर्ती शरद बोबडे हिंदुस्थानचे ४७ वे सरन्यायाधीश असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ न्यायाधीश असलेल्या रंजन गोगोई यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून थपथ घेतली होती. ते १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. दरम्यान, बोबडे यांच्या नियुक्तीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली असून ते देशाचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी सकाळी साडेनऊ वाजता शपथ घेत पदभार स्वीकारला आहे.

- Advertisement -

 

शरद बोबडे यांच्याविषयी…

न्या. शरद बोबडे नागपूरला वकिली करत असताना त्यांच्या सभोवताली अनेक मोठी माणसे वावरत होती. यामध्ये अनेक राजकारणी, साहित्यिक, गायक यांचा देखील समावेश असायचा. विशेष म्हणजे त्यांचा मोठा सामाजिक समूह होता. त्यात विविध चर्चा होत असे. तसेच २५ वर्षांपूर्वी शरद बोबडे यांनी शेतकरी प्रश्न सोडवण्याची तयारी केली होती. शेतकरी नेते शरद जोशी यांच्याशी त्यांचा खूप घनिष्ठ संबंध आला. तसाच तो ज्ञानयोगी श्रीकांत जिचकार यांच्याशीही आला. त्यातून शेतकरी आणि त्यांचे प्रश्न बोबडे यांच्या ‘वकिली मनात’ घर करु लागले. त्यातून शेतकऱ्यांना न्याय आणि दिलासा देणारी एक कल्पना पुढे आली. शेतकरी आंदोलन तेव्हा खूप टोकावर होत होते. शेतकऱ्यांनी बँकांची कर्जे घेतली होती. त्याच्या वसुलीसाठी बँकांनी खूप तगादा शेतकऱ्यांना लावला होता. तसेच शेतकरी कर्ज देऊ शकणार नव्हते. त्यासाठी शेतकऱ्यांनी बँकांवर ‘नादारी’चे अर्ज भरुन दिले. त्याचप्रमाणे कर्ज देणार नाही, असे देखील ठणकावले. शेतकऱ्यांच्या बाजूची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया वकील शरद बोबडे यांनी पूर्ण केली होती. त्यानंतर शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीच्या चळवळी सुरु झाल्या असा ऐतिहासिक प्रवास न्या. बोबडे यांचा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आज शरद पवार-सोनिया गांधी भेट; पाठिंब्यावर दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -