घरदेश-विदेशसुरु करा 'हा' व्यवसाय आणि मंदीतही कमवा महिन्याला ५० हजार

सुरु करा ‘हा’ व्यवसाय आणि मंदीतही कमवा महिन्याला ५० हजार

Subscribe

जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात किंवा तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर जूट कॅरीबॅग उत्पादनाचा पर्याय योग्य ठरु शकतो.

मोदी सरकारने राज्यासह देशभरात प्लास्टिक बंदी केली. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा सर्वात जास्त समावेश होता. बाजारात, दुकानांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सर्वाधिक प्रमाणात केला जायचा. मात्र, प्लास्टिकमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास लक्षात घेऊन प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली. या बंदीनंतर पर्याय म्हणून गोल्ड फायबर अर्थात जूटकडे पाहिले गेले. प्लास्टिक बंदीचा फायदा हा जूट मिल्सला सर्वाधिक झाला. कारण बाजारात प्लास्टिकच्या बंदीमुळे जूटच्या पिशव्या आल्या आहेत. जूट मिल्सला कॅरीबॅगच्या (पिशव्यांच्या) ऑर्डर दिल्या जात आहेत. मात्र, या पिशव्यांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे जूट कॅरीबॅगचे उत्पादन करणाऱ्या काही मिल्सने आता आणखी जास्त ऑर्डर देऊ नये असे सरकारला सांगितले आहे. त्यामुळे जर तुम्ही नोकरीच्या शोधात आहात किंवा तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर जूट कॅरीबॅग उत्पादनाचा पर्याय योग्य ठरु शकतो.


हेही वाचा – आता तात्काळ मिळणार PAN कार्ड

- Advertisement -

बिर्ला जूट मिल्सकडे २० लाख जूट पिशव्यांची ऑर्डर

बिजनसे स्टँडर्डने दिलेल्या माहितीनुसार, बिर्ला कॉर्पोरेशनची यूनिट बिर्ला जूट मिल्सकडे सध्याच्या घडीला २० लाख जूट पिशव्यांची ऑर्डर मिळालेली आहे. ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी बिर्ला जूट मिल्सचे कर्मचारी प्रचंड कंबर कसत आहेत. ‘गेल्या वर्षी आम्ही या युनिटची सुरुवात केली. आमच्या युनिटची क्षमता ही महिन्याला दीड लाख पिशव्या बनवण्याची आहे’, असे बिर्ला जूट मिल्सचे सहाय्यक उपाध्यक्ष आदित्य शर्मा म्हणाले. यासोबतच त्यांनी असेही सांगितले की, ‘पिशव्यांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांच्या आत अशीच क्षमता असलेले आणखी एक युनिट आम्ही सुरु करणार आहोत.’ भारतीय जूट मिल्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि मालक संजय कजारिया यांनी सांगितले की, ‘जूट पिशव्यांची वाढती मागणी बघता जूट उत्पादनात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.’


हेही वाचा – गुडविन ज्वेलर्सचे मालक परदेशात पळण्याची शक्यता

- Advertisement -

जूट पिशव्यांच्या व्यवसायासाठी लागतील इतके पैसे

मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल्सच्या हँडीक्राफ्ट विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला जूट बॅग मेकिंग यूनिट सुरु करायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी ५ शिलाई मशीन खरेदी करावी लागतील. यासाठी तुम्हाला ९० हजार रुपयांचा खर्च येईल. याशिवाय १ लाख ४ हजार रुपये वर्किंग कॅपिटलची गरज लागणार आहे. याशिवाय इतर खर्चासाठी साधारणत: ५८ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. त्यामुळे या व्यवसायासाठी २.५२ लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

एक प्रतिक्रिया

  1. कुठल्या कंपनीच्या भल्यासाठी आपण हे महत्कार्य करत आहात? कारण बातमीपेक्षा ही जाहिरात जास्त वाटते आहे. मोहन देवळे.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -