Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश पाहा, नासाच्या JWST दुर्बिणीने टिपले नेपच्यून ग्रहाचे आकर्षक फोटो

पाहा, नासाच्या JWST दुर्बिणीने टिपले नेपच्यून ग्रहाचे आकर्षक फोटो

Subscribe

नासाच्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने (JWST) नेप्यूचन आणि त्याच्या भोवतालच्या वलयांचा पहिला वहिला फोटो घेतला आहे. शनि ग्रहाभोवतालच्या कड्याप्रमाणे नेपच्यूनला देखील कड्या आहेत. नासाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नेपच्यून ग्रहाचे आकर्षक फोटो पोस्ट केले आहेत. गेल्या 33 वर्षांत या ग्रहाच्या कड्या स्पष्ट दिसणारा हा फोटो आहे. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप इन्फ्रारेड कॅमेऱ्यांनी बर्फाने वेढलेल्या या ग्रहाचा हा आकर्षक फोटो टिपला आहे. वेब टेलीस्कोपद्वारे नेपच्यून ग्रहाचा अभ्यास करणारे आणि या दुर्बिणाचे जाणकार, तज्ञ, आंतरविद्याशाखीय शास्त्रज्ञ हेडी हॅमेड एका ब्लॉगमध्ये म्हटले की, अस्पष्ट, धुळीने माखलेल्या कड्यांचा शोध घेऊन जवळपास तीन दशकं लोटली.मात्र ही पहिलीच वेळ आहे जिथे आम्हाला ती इन्फ्रारेडमध्ये स्पष्टपणे दिसली.

- Advertisement -

नासाच्या JWST ने टिपलेल्या नेपच्यूनच्या कड्यांचा फोटो अगदी स्पष्ट दिसतोय. नेपच्यून ग्रह अगदी मोत्यासारखा चमकत असून त्याभोवती एकाग्र अंडाकृती अशी आकर्षक कडा दिसतेय. नेपच्यूनला आतील भागातील रासायनिक रचनेमुळे बर्फाचा ग्रह म्हणून ओळखले जाते. गुरु आणि शनि ग्रहाच्या तुलनेत नेपच्यून ग्रहावर हायड्रोजन आणि हेलियम घटक सर्वाधिक आहे. JWST ने टिपलेल्या फोटोत एक वेगळीच चमक दिसतेय, इतकेच नाही तर वेबने नेपच्यूनच्या 14 ज्ञात चंद्रांपैकी सातही चंद्रांचे फोटो देखील घेतले आहे. वेबने टिपलेल्या फोटोत प्रकाशाचा एक अतिशय तेजस्वी बिंदू म्हणजे नेपच्यूनचा मोठा आणि असामान्य चंद्र, ट्रायटन दिसत आहे. हा चंद्रावर गोठलेला घनरुप नायट्रोजन असून या ग्रहावर पडणारा 70 टक्के सूर्यप्रकाश हा परावर्तित होतो. यामुळे हा ग्रह तेजस्वी आणि आकर्षक दिसतो.

1846 मध्ये नेपच्यून ग्रहाचा शोध लागला तेव्हापासून हा ग्रह संशोधकांना भूरळ घालतोय. सूर्यापासून आणि पृथ्वीपेक्षा 30 पट जास्त अंतरावर आहे म्हणून त्यांच्या कक्षा बाह्य सौर मंडळाच्या दुर्गम, गडद प्रदेशात आहेत. नासाच्या म्हणण्यानुसार, सूर्य नेपच्यूनपासून इतका दूर आहे की या ग्रहावर दुपार पृथ्वीवरील मंद प्रकाशासारखी असते.


वाढते अपघात टाळण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; आता कारच्या प्रत्येक सीटसाठी सीट बेल्ट अलार्म बंधनकारक


- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -