घरदेश-विदेशज्योतिरादित्य सिंधिया यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोरोनाची लागण; ट्वीट करत दिली माहिती

Subscribe

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर ह‌‌ॅंडलवरुन ट्वीट करत ही माहिती दिली आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना टेस्ट केली, तर रिपोर्ट पा‌ॅजिटीव्ह आल्याचं सिंधिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर ह‌‌ॅंडलवरुन ट्वीट करत ही माहिती दिली आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार कोरोना टेस्ट केली, तर रिपोर्ट पा‌ॅजिटीव्ह आल्याचं सिंधिया यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. ( Jyotiraditya Scindia infected with Corona The information was given by tweeting )

ज्योतिरादित्य सिंधिया यांचं ट्वीट

डाॅक्टरांच्या सल्ल्याने केलेल्या कोविड-19 च्या तपासणीत माझा रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी सर्वांनी खबरदारी घ्यावी. तसचं, जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन स्वत:ची चाचणी करुन घ्यावी, अशी विनंती ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

ज्योतिरादित्य सिंधिया हे 16 एप्रिल रोजी ग्वाल्हेरमध्ये आंबेडकर महाकुंभामध्ये सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही डी शर्मा, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांची भेट घेतली होती. ज्योतिरादित्या सिंधिया हे सध्या डाॅक्टरांच्या सल्ल्याने विलगीकरणात आहेत.

( हेही वाचा: धक्कादायक, पुण्यातील शाळेत दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सेंटर, NIAकडून मोठी कारवाई )

ज्योतिरादित्य सिंधिया यांचा मुलगा कोरोना पाॅजिटिव्ह

ज्योतिरादित्या सिंधिया यांचे पुत्र महाआर्यन सिंधिया यांना देखील 13 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांना खोकला आणि सर्दीचा त्रास झाल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर रिपोर्ट पा‌‌झिटीव्ह आला. ते सध्या जयविलास पॅलेसमधील विलगीकरणात आहेत.

नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन 

महाराष्ट्रात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये 71 टक्के रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक असल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नागरिक मात्र, म्हणावी तशी काळजी घेत नसल्याचे चित्र आहे. सध्या केंद्र सरकारकडून कोरोना लशींचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे मे महिन्यापर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

( हेही वाचा: मानखुर्दमध्ये अग्नितांडव: भंगाराच्या दुकानाला भीषण आग;अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -