घरताज्या घडामोडीकाबूल विमानतळावर दहशतवादी हल्ला करणारे आयएसके (Isk)आहे तरी कोण?

काबूल विमानतळावर दहशतवादी हल्ला करणारे आयएसके (Isk)आहे तरी कोण?

Subscribe

तालिबान्यांच्या राज्यात ही नवीन दहशतवादी संघटना कोण असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. पण ही संघटना जुनीच असून तालिबान आणि Isk मध्ये कट्टर शत्रुत्व आहे.

काबुल विमानतळावर गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटच्या खोरासन Isk संघटनेने स्विकारली आहे. यामुळे तालिबान्यांच्या राज्यात ही नवीन दहशतवादी संघटना कोण असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. पण ही संघटना जुनीच असून तालिबान आणि Isk मध्ये कट्टर शत्रुत्व आहे.

आयएसके या क्रूर दहशतवादी संघटनेचा थेट संबंध पाकिस्तानशी आहे. २०१४ साली पाकिस्तानहून अफगाणिस्तानमध्ये पळून आलेल्या तालिबान्यांनी ही संघटना स्थापन केली होती. या संघटनेत सुन्नी पंथीय मुस्लीम होते. या Isk संघटनेने पाकिस्तानला लागून असलेल्या सीमा क्षेत्रांवर वर्चस्व निर्माण केलं . त्यानंतर तालिबानलाही Isk ने आव्हान दिलं होते.

- Advertisement -

एप्रिल २०१७ मध्ये अमेरिकेने याच आयएसकेच्या तळांवर मदर ऑफ ऑल बॉम्ब म्हणजेच सर्वात शक्तीशाली २०,००० पौंड वजन असलेला बॉम्ब फेकला होता.

याच आयएसकेने अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही वर्षात अनेक आत्मघातकी हल्ले घडवूनही आणले. तसेच शेकडो ग्रामीण नागरिक आणि अफगाणमध्ये काम करणाऱ्या रेड क्रॉस संघटनेच्या सदस्यांची गळे चिरून निघृण हत्या केल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी हल्ले घडवून आणणे, मोठा नरसंहार करणे हे आयएसकेचे उद्देश्य आहे. काबुलसह अफगाणिस्तानमधील अनेक शहरातील सरकारी ठिकाणे आणि नाटोच्या लष्करी तळांवर आयएसकेने हल्ले केले आहेत. आयएसके या दहशतवादी संघटनेचे तालिबानसह अनेक दहशतवादी संघटनेशी वैमनस्य आहे. पण सिरिया आणि इराकमधील इसिस या संघटनेशी आयएसकेचा थेट संबंध नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -