‘Kacha Badam Singer’ भुबन बदयाकर रस्ते अपघातात जखमी; छातीला दुखापत झाल्याने रुग्णालयात केले दाखल

kacha badam singer bhuban badayakar injured in birbhum district in west bengal
Kacha Badam Singer भुबन बदयाकर रस्ते अपघातात जखमी, छातीला दुखापत झाल्याने रुग्णालयात केले दाखल

‘कच्चा बदाम’ हे गाणं गाणारा (Kacha Badam Singer) गायक भुबन बदयाकर सोमवारी एका रस्ते अपघातात जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी पश्चिम बंगालमधील बीरभूम येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गायक भुबन हा सेकंड हँड कार चालवायला शिकत होता. याचदरम्यान झालेल्या अपघातात त्याच्या छातीसह इतर ठिकाणी दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

भुबन बदयाकर हा पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील कुरालजुरी गावचा रहिवासी आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले व एक मुलगी असा परिवार आहे. आतापर्यंत भुबन शेंगदाणे विकून उदरनिर्वाह करत होता. यावेळी त्याने ग्रामीण भागातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘कच्चा बदाम’ हे गाणे तयार केले आणि स्वतःच्या स्वरबद्ध सुरात गायला सुरुवात केली. अचानक कोणीतरी हे गाणे मोबाईलवरून रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केले, जे काही दिवसात व्हायरल झाले आणि शेंगदाणे विकणारा भुबन रातोरात देशात आणि जगात प्रसिद्ध झाला.

शेंगदाणे विक्रेता भुबन इतका प्रसिद्ध झाला की, एका म्युझिक कंपनीने त्याला लाखो रुपयांचा चेक दिला आणि त्याच्यासोबतचा एक म्युझिक व्हिडिओही प्रसिद्ध केला. आता त्याला अनेक टीव्ही शो आणि कार्यक्रमांच्या ऑफर्सही येऊ लागल्या आहेत. भुबन एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत म्हणाला होता की, त्याला सरकारने मदत करावी, जेणेकरून त्याच्या राहण्यासाठी कायमस्वरूपी घराची व्यवस्था करता येईल. कुटुंबाला चांगले अन्न आणि कपडे घालण्यासाठी द्या.

‘कच्चा बदाम’ गाणाऱ्या भुबनचा प्रवास अनेकांना प्रेरित करणार आहे. ‘कच्चा बदाम’ फेम भुबनची लोकप्रियता इतकी आहे की, लोकांनी त्याच्यासोबत सेल्फी काढायला सुरुवात केली आहे. भुबनने एका मुलाखतीत सांगितले होते की, आता त्याने शेंगदाणे विकणे बंद केले आहे, कारण तो सेलिब्रिटी झाला आहे.


Russia-Ukraine War : अमेरिकेच्या निर्बंधांवर पुतिन यांचा पलटवार, अमेरिका अन् मित्र राष्ट्रांवर केली कारवाई