‘काली’ पोस्टर वादामध्ये आता सीएम ममतांची उडी; म्हणाल्या, भावना समजून…

काली पोस्टरवरून देशभरात मोठ्या संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक हिंदू संघटनांकडून या पोस्टरला कडाडून विरोध झाला. तर सोशल मीडियावरही पोस्टरचा निषेध केला जातोय, आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी त्यांच्या पक्षाच्या नेत्या महुआ मोइत्रा यांना अप्रत्यक्षपणे एक सल्ला दिला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भावना समजून घेतल्या जात नाहीत. आपण जे पण काही करतो त्यात नेहमी राजकारण शोधले जाते. यावेळी चांगल्या गोष्टी मागे ठेवत फक्त नकारात्मक गोष्टी पुढे आणल्या जातात.

बंगालच्या मुख्यमंत्र्यांचा सल्ला

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, जेव्हा तुम्ही मुलासाठी काही बनवण्याचा विचार करता, तेव्हा तुम्हाला लहान मुलासारखा विचार करुन त्या गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक ठिकाणाला एक महत्त्व आहे. काही लोक फक्त ओरडण्याचे काम करतात. आधीची कविता बघा, त्यात प्रेषित मोहम्मद पैगंबरांपासून धर्मापर्यंत सर्व काही आहे. आपण हे विसरलात का की, आपलेच विद्यार्थी हार्वर्ड आणि केंब्रिज चालवत आहेत, ते फक्त अभ्यासच करतात असे नाही, सध्या मी जे काय बोलतेय त्यातही राजकारण दिसेल.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने हे विधान अशावेळी करण्यात आले आहे, जेव्हा त्यांच्याच पक्षाच्या नेत्या महुआ मोइत्रा या काली पोस्टरमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांच्या या पोस्टरवर जोरदार टीका होत आहे. मात्र महुआ मोइत्रा यांच्या वक्तव्यापासून टीएमसीने स्वतःला दूर ठेवले आहे.

महुआ मोइत्रा काय म्हणाल्या?

महुआ मोइत्रा यांना इंडिया टुडेच्या वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत काली या डॉक्युमेंट्री फिल्मच्या पोस्टवर प्रश्न विचारण्यात आला. यावेळी महुआ मोइत्रा म्हणाल्या की, कालीची अनेक रूपे आहेत. माझ्यासाठी काली म्हणजे मांसप्रेमी आणि दारुचा (wine) स्वीकार करणारी देवी. यावर लोकांची वेगवेगळी मतं आहेत. मला यात काही अडचण नाही,

टीएमसी खासदार महुआ मोइत्रा पुढे म्हणाल्या की, तुम्ही तुमचा देव कसा पाहता? तुम्ही भूतान आणि सिक्कीममध्ये गेल्यास सकाळी पूजेत देवाला व्हिस्की अर्पण केली जाते, पण जर तुम्ही हा नैवेद्य यूपीमध्ये एखाद्याला देवाला दाखवल्यास त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. .

‘काली’ चित्रपटाच्या पोस्टरशी संबंधित वादाच्या संदर्भात महुआ मोइत्रा यांनी समर्थन करत म्हटले की, जर तुम्ही तारापीठात गेलात तर तुम्हाला काली मंदिराबाहेर साधू धूम्रपान करताना दिसतील. ते लोकही कालीची पूजा करतात. एक हिंदू असल्यामुळे मला कालीकडे कसे पाहायचे याचे स्वातंत्र्य आहे आणि लोकांनीही ते असले पाहिजे. लोकांनी त्यांच्या देवाची पूजा कशी करावी याचे स्वातंत्र्य त्यांना दिले पाहिजे.


माझ्यासाठी कालीचा अर्थ मांसाहार आणि मद्यपान स्वीकार करणारी देवी… महुआ मोइत्रा यांचं ट्वीट