माझ्यासाठी कालीमाता मांसाहार आणि मदिरा स्विकारणारी- तृणमूल खासदार महुआ मोइत्रा

तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कालीमातेचे अनेक रुपं असून माझ्यासाठी कालीमाता ही मांसाहार प्रिय असलेली आणि मदिरा स्विकार करणारी देवी आहे असं त्या म्हणाल्या ाहेत.

‘काली’ या माहितीपटाच्या पोस्टरवरून  देशात वाद निर्माण झाला असून निर्मात्या लीना मणिमेकलाई ( leena manimekalai) यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचदरम्यान तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. कालीमातेचे अनेक रुपं असून माझ्यासाठी कालीमाता ही मांसाहार प्रिय असलेली आणि मदिरा स्विकार करणारी देवी आाहे. लोकांच्या वेगवेगळ्या भावना आहेत. असे त्या म्हणाल्या आहेत. India Today Conclave East 2022 या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांनी देवांच्या विविध रुपाप्रती सगळ्यांच्या भावना वेगवेगळ्या असतात. जर तुम्ही भूतान आणि सिक्किमला गेलात तर तेथे सकाळी पूजेमध्ये देवाला व्हिस्की अपर्ण केली जाते.पण जर हेच तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये कोणाला प्रसाद म्हणून दिलंत तर त्यांच्या भावना दुखावू शकतात. याचप्रमाणे कालीमाता ही माझ्यासाठी मांसाहार प्रेमी आणि मदिरा सेवन करणारी देवी आहे. कारण कालीमातेचे अनेक रुपं आहेत. तसेच जर तुम्ही तारापीठला गेलात तर कालीमातेच्या मंदिराजवळ साधू तुम्हांला सिगारेट बिडी ओढताना दिसतील. तेच लोक कालीमातेची पूजाही करतात. हिंदू असूनही मला माझी कालीमाता कोणत्या रुपात बघायची आहे याचा अधिकार आहे. आणि असायलाच हवा. असेही महुआ यांनी यावेळी म्हटले. तसेच यावेळी सध्या देशात सुरू असलेल्या नुपूर शर्मा आणि जुबैर मोहम्मद यांच्यावरील वादावरही आपले मत मांडले.