KAMAL KHAN : ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. बटलर पॅलेस, लखनऊ येथे असलेल्या सरकारी बंगल्यात ते कुटुंबासह राहत होते. तेथे शुक्रवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

KAMAL KHAN: Senior journalist Kamal Khan dies of a heart attack
KAMAL KHAN :  ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

उत्तर प्रदेशातील ज्येष्ठ पत्रकार कमाल खान यांचे निधन झाले आहे. लखनऊ येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कमाल खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी कमाल खान यांना मृत घोषित केले. कमाल खान यांचा विवाह पत्रकार रुचि कुमारसोबत झाला होता. बटलर पॅलेस, लखनऊ येथे असलेल्या सरकारी बंगल्यात ते कुटुंबासह राहत होते. तेथे शुक्रवारी 14 जानेवारीला पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सध्या कमाल खान हे NDTV वृत्तवाहिनीचे संपादक म्हणून काम करत होते. दरम्यान, कमाल खान यांचा रामनाथ गोएंका पुरस्कार देऊन, सन्मानित केले. याशिवाय त्यांना भारताच्या राष्ट्रपतींकडून गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी दीर्घकाळ टीव्ही पत्रकारितेत काम केले असून, त्यांच्या बातमी सादर करण्याच्या अनोख्या शैलीचे देशभरात कौतुक होते. जेष्ठ पत्रकार कमाल खान यांच्या निधनानंतर सोशल मिडियावर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.