घरताज्या घडामोडीKamala Harris Covid Positive : दोन बूस्टर डोस घेऊनसुद्धा कमला हॅरिस कोरोना...

Kamala Harris Covid Positive : दोन बूस्टर डोस घेऊनसुद्धा कमला हॅरिस कोरोना पॉझिटिव्ह

Subscribe

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना कोरोनाची लागण झाली आहे. परंतु त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. अमेरिकेचे प्रेस सेक्रेटरी कस्टर्न ऍलन यांनी कमला हॅरिस यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली आहे. कमला हॅरिस क्वारंटाईन असून त्या आपले अधिकृत काम करत राहणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसमधून देण्यात आली आहे. कोरोनावर मात केल्यानंतर कमला हॅरिस व्हाईट हाऊसमध्ये येतील असे सांगण्यात आले आहेत. त्यांनी कोरोना लसीचे दोन डोस तसेच बूस्टरचे २ डोस घेतले असूनसुद्धा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी एप्रिल महिन्यातच बूस्टरचा दुसरा डोस घेतला होता. त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे अद्याप आढळली नाहीत. व्हाईट हाऊसने सांगितले की रॅपीड आणि आरटीपीसीआर अशा दोन्ही चाचण्या करण्यात आल्या ज्यामध्ये कमला हॅरिस यांचा अहवाल कोरोना सकारात्मक आला आहे.

- Advertisement -

यूएस उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या पतीला मार्च महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. परंतु तेव्हा कमला हॅरिस यांचा कोरोना अहवाल नकारात्मक आला होता. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली होती. परंतु त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. गेल्या काही दिवसांत वॉशिंग्टनमधील अनेक प्रभावशाली लोकांना कोरोनाचा फटका बसला आहे. मार्चमध्ये व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन पासकी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. याशिवाय अमेरिकन काँग्रेसच्या नॅन्सी पेलोसी यासुद्धा कोरोना संक्रिमित आढळल्या होत्या.

जो बायडेन यांच्याशी संपर्क नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या संपर्कात आले नव्हते अशी माहिती व्हाईट हाऊसमधून देण्यात आली आहे. अमेरिकेत आतापर्यंत सुमारे 9.83 लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजही अमेरिकेत कोरोनामुळे दररोज ३०० ते ४०० लोकांचा मृत्यू होत आहे. अमेरिकेतील सर्वाधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या अमेरिकेत कोरोना परिस्ठिती आटोक्यात आली असली तरी अनेक भागात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Bird flu in Human : नवं टेन्शन! चीनमध्ये चार वर्षांच्या मुलाला बर्ड फ्ल्यूची लागण

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -