कंगनाचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य म्हणाली, अशा महिलांच्या पोटी बलात्कारी जन्मतात

Kangana Ranaut Controversy congress shivsena demands to take back padma shri from kangana for seditious remarks and
Kangana Ranaut Controversy: स्वातंत्र्याबाबत कंगनाचे वादग्रस्त वक्तव्य, पद्मश्री काढून घेण्याची राजकीय पक्षांची मागणी

अभिनेत्री कंगना रणावतचा लवकरच पंगा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने कंगना जोरदार प्रमोशन करत आहे. या प्रमोशन दरम्यान कंगनाला निर्भया केस संदर्भातील दोषींना फाशीची शिक्षा देऊ नये, निर्भयाच्या आईने त्यांना माफ कारवं अशी प्रतिक्रीया एका बाईने दिली होती. यावर कंगनाला प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलतना कंगना म्हणाली, ‘त्या बाईला त्या दोषींबरोबर चार दिवस जेलमध्ये ठेवा’. अशी प्रतिक्रीया दिली.

या पुढे बोलताना कंगना म्हणाली, त्या दोषींवर कोणाला दया येत असेल तर तीला त्यांच्या बरोबर ठेवा. मला कळत नाही अशी दया कशी तीला येऊ शकते. अशाच आईच्या पोटातून असे गुन्हेगार जन्म घेत असतात. अशाच बाईच्या पोटी गुन्हेगार जन्माला येतात. ज्यांना दोषींवर दया येते. ‘

निर्भयाच्या दोषींवर ५० हजार खर्च

तिहार तुरूंगात असणाऱ्या निर्भयाच्या चार दोषींच्या सुरक्षेवर दररोज ५० हजारांचा खर्च करण्यात येत आहे. न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर या दोषींच्या सुरक्षारक्षेत वाढ करण्यात आली आहे. तुरूंगाच्या बाहेर ३२ सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. फाशीबरोबर इतर कामांवरही पैसे खर्च होत आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्याची प्रत्येक दोन तासांनी शिफ्ट बदलली जाते. शिक्षा सुनावल्यानंतर कैदी आत्महत्या करू नये, तुरूंगातून पळून जाऊ नये. या साठी कैंद्यांच्या सुरक्षेवर खर्च करण्यात येत आहे.

१ फेब्रुवारीला होणार फाशी

निर्भयाच्या दोषींना १ फेब्रुवारीला फाशी देणार येणार आहे. ३० जानेवारीला जल्लादला बोलवण्यात आले आहे. जेणेकरून जल्लादक फाशी देण्याचे प्रात्यक्षिक करू शकेल.