नवी दिल्ली : गेल्या 5 वर्षांपासून बॉलीवूडची अभिनेत्री कंगना रणौत आणि भारतीय सिनेमाचे ज्येष्ठ संगीतकार, संवादलेखक जावेद अख्तर यांच्यामध्ये न्यायालयीन युद्ध सुरू होते. पण, अखेर दोघांमधील ही लढाई संपल्याचे समोर येताच अभिनेत्री कंगना रणौतने एक पोस्ट करत सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. दोघांनीही परस्पर संमतीने एक करार केल्यानंतर तिने दोघांचा एकत्र फोटो पोस्ट करत एका सिनेमासाठी एकत्र काम करणार असल्याचे जाहीर केले. कंगनाच्या पुढील सिनेमासाठी जावेद अख्तर हे एक गाणे लिहणार आहेत. त्यामुळे न्यायालयीन लढाई संपताच दोघांनीही मात्रीपूर्ण सुरुवात केली आहे. (Kangana Ranaut, Javed Akhtar settle defamation case working together)
हेही वाचा : Omar Abdullah On Kejriwal : जम्मू – काश्मीरच्या जनतेचे भले करायचे…, काय म्हणाले ओमर अब्दुल्ला
भाजप खासदार कंगना रणौतने इंस्टाग्रामवर जावेद अख्तर यांच्यासोबत एक फोटो पोस्ट केला. त्यावर लिहिले की, “जावेद अख्तर आणि मी मध्यस्थीद्वारे (मानहानीचा) कायदेशीर प्रश्न सोडवला आहे. जावेद अख्तर यांनी मध्यस्थी करताना खूप दयाळूपणा दाखवला. त्यांनी माझ्या पुढच्या दिग्दर्शनासाठी गाणी लिहिण्यासही होकार दिला.” असे ती म्हणाली आहे. दरम्यान, 5 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर कंगणा रणौत आणि जावेद अख्तर यांनी आपापसातील सहमतीने हा खटला संपवला. कंगणाच्या माफीनाम्यामुळे अख्तर आणि कंगना रणौत यांच्यात समेट झाला. कंगना रणौतने कराराच्या लेखी अटींमध्ये म्हटले आहे की, त्यांना जावेद अख्तर यांच्या बद्दल खूप आदर आहे. माझ्या विधानांमुळे जावेद अख्तर यांना झालेल्या गैरसोयीबद्दल मी माफी मागते. मी भविष्यात असे कोणतेही विधान करणार नाही. मी माझी सर्व विधाने मागे घेते, असे म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
कंगना रणौत आणि जावेद अख्तर यांच्यातील वाद बराच काळ सुरू होता. कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते. 2016 मध्ये कंगनाने जाहीरपणे हृतिक रोशनवर अनेक आरोप केले होते. जावेद अख्तर हे रोशन कुटुंबियांच्या नजीकचे मानले जातात. कंगनाचा आरोप होता की जावेद अख्तर यांनी कंगनाला त्यांच्या घरी बोलावले आणि बैठक घेतली. तसेच, त्यांनी हे सर्व थांबवावे आणि हृतिक रोशनची माफी मागावी, असे आरोप केले होते. मग जावेद अख्तर यांचे बोलणे ऐकून कंगना रणौत आली होती. पण दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर कंगनाने एका कार्यक्रमात जावेद अख्तर यांच्याविरोधात विधान केले. यानंतर जावेद अख्तर यांनी तिच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला.