कंगनाने घेतली योगी आदित्यनाथांची भेट; ODOP ची बनली ब्रँड अँबेसेडर

Kangana Ranaut Meets Yogi Adityanath Appointed ODOP Brand Ambassador
कंगनाने घेतली योगी आदित्यनाथांची भेट

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही उत्तर प्रदेश सरकारच्या ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ (ODOP) या महत्त्वाकांक्षी योजनेची ब्रँड अँबेसेडर असणार आहे. कंगनाने शुक्रवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. MSME विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नवनीत सेहगल यांनी माहिती दिली की कंगना राणावत राज्य सरकारच्या ODOP योजनेची ब्रँड अँबेसेडर असेल. मुख्यमंत्र्यांनी कंगनाला ओडीओपी उत्पादनांची किटही भेट दिली.

कंगना मुरादाबादमध्ये तेजस चित्रपटाचे शूटिंग संपवून लखनौला पोहोचली. कंगनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून योगी आदित्यनाथला भेटणार असल्याची माहिती दिली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने आधी याला सौजन्यपूर्ण भेट असल्याचं सांगितलं होतं. परंतु नंतर त्यांनी कंगनाला ओडीओपी योजनेची ब्रँड अँबेसेडर म्हणून घोषित केलं.

एक जिल्हा एक उत्पादन हा उत्तर प्रदेश सरकारचा एक प्रमुख कार्यक्रम आहे. ज्याचा उद्देश स्वदेशी आणि विशेष उत्पादने आणि हस्तकलांना प्रोत्साहित करणे आहे. सरकारचे म्हणणं आहे की नक्षीकाम, भरतकाम, काळे मीठ इत्यादी काही उत्पादने उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये तयार केली जातात जी कुठेही आढळत नाहीत. बैठकीदरम्यान कंगनाने योगी आदित्यनाथ यांच्या यूपीतील कार्याची प्रशंसा केली आहे. याशिवाय योगी आदित्यनाथ यांनी कंगनालाही अयोध्येत येण्याचे आमंत्रण दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)