घरताज्या घडामोडीरिंकू शर्मा प्रकरणात कंगनाने साधला अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा

रिंकू शर्मा प्रकरणात कंगनाने साधला अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा

Subscribe

रिंकू शर्मा हत्या प्रकरणात कंगना आता आक्रमक झालेली पहायला मिळत आहे. कंगनाने ट्विट करत अरविंद केजरीवाल यांना धारेवर धरले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या चांगलीच चर्चेत आहे. कंगना प्रत्येक गोष्टीत तिचे मात मांडत असते. ट्विटच्या माध्यमातून कंगना सध्या विविध विषयावर भाष्य करत असते. दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाविषयी कंगनाने आता थेट दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. रिंकू शर्मा हत्या प्रकरणात कंगना आता आक्रमक झालेली पहायला मिळत आहे. कंगनाने ट्विट करत अरविंद केजरीवाल यांना धारेवर धरले आहे. कंगनाने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत अरविंद केजरीवाल यांना खडे बोल सुनावले आहे. रिंकू शर्मा हिच्या हत्येचे प्रकरण सध्या चांगलेच जोर धरुन आहे. हाच मुद्दा उचलून कंगनाने तिच्या ट्विटरवरुन आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली आहे. कंगनाने एक व्हिडिओ शेअर करत ‘अरविंद केजरिवाल तुम्हाला लाज वाटली पाहिजे’, अशा शब्दात त्याच्यावर जोरदार टिका केली आहे.

कंगनाने तिच्या ट्विटरवरुन एका महिलेचा व्हिडिओ शेअर करत ‘अरविंद केजरीवाल तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे सर्व काही तुमच्या अल्पसंख्यांक असलेल्या राजकारणामुळे झाले आहे. त्यांना वाटलं दिल्लीत त्यांची जिहादी सत्ता आहे. चांगला व्यवहार असणारा,स्वत:चे घर सांभाळणारा एकटा मुलगा होता. फक्त रामराम म्हणण्यासाठी त्याची खुलेआम हत्या केली’, असे कंगनाने तिच्या ट्विटमध्ये म्हणत केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -


या आधीही कंगनाने केजरीवालांवर निशाणा साधला होता. ‘अरविंद केजरीवाल तुम्ही रिंकू शर्माच्या वडिलांचे दुख: समजून घ्या आणि आपल्या कुटुंबातील मुलांचा विचार करा. काही दिवसांनी जय श्री रामच्या सांगण्यावरुन दुसऱ्या हिंदूला ठार मारण्यात येईल’, असे कंगनाने म्हटले होते. रिंकू शर्माच्या हत्येनंतर संपूर्ण देशात खळबळ माजली होती. राम मंदिरासाठी वर्गणी गोळा केली म्हणून हत्या करण्यात आली असा अरोप करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये रिंकूवर चाकूने हल्ला करण्यात आला आणि हल्ला करणाऱ्यालाही सगळी लोक ओळखतात असेही त्यांनी म्हटले होते. या घटनेनंतर कंगनाने एकाहून एक ट्विट करायला सुरुवात केली आहे. कंगनाने बऱ्याच वेळा अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात ट्विट करुन बऱ्याचदा त्यांना सल्लेही दिले आहेत. अरविंद केजरीवाल यांना या प्रकरणावरुन ट्रोलही करण्यात आले.


हेही वाचा – ‘भूक, बेरोजगारी व आत्महत्या, मोदींचे देशाला तीन पर्याय’

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -