घरदेश-विदेशKangana Ranaut: अश्लील पोस्टवरून गदारोळ, कंगना रणौतचं सडेतोड उत्तर; काँग्रेस नेता बॅकफूटवर

Kangana Ranaut: अश्लील पोस्टवरून गदारोळ, कंगना रणौतचं सडेतोड उत्तर; काँग्रेस नेता बॅकफूटवर

Subscribe

हिमाचल प्रदेश: काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या आक्षेपार्ह पोस्टवर भाजप उमेदवार बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसवर निशाणा साधत तिने लिहिलं की, प्रत्येक महिला सन्मानास पात्र आहे. या संपूर्ण गदारोळानंतर मी ही पोस्ट केली नसल्याचं सुप्रिया यांनी स्पष्ट केले आहे. “माझ्या मेटा अकाउंटवर (एफबी आणि इंस्टाग्राम) प्रवेश असलेल्या कोणीतरी ही अत्यंत घृणास्पद आणि आक्षेपार्ह पोस्ट पोस्ट केली, जी काढून टाकण्यात आली आहे,” असं सुप्रिया यांनी म्हटलं आहे. असं असलं तरीही भाजप नेत्यांनी काँग्रेस हायकमांडकडे सुप्रिया श्रीनेत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (Kangana Ranaut Uproar over obscene post Kangana Ranaut s scathing reply Congress leader on backfoot)

सुप्रिया श्रीनेत यांच्या इन्स्टा अकाऊंटवरून आलेल्या अश्लील पोस्टबद्दल कंगना रणौतने ट्विट केले की, ‘कलाकार म्हणून मागील 20 वर्षांच्या कारकिर्दीत मी सर्व प्रकारच्या महिलांच्या भूमिका केल्या आहेत. क्वीन सिनेमातून एका साध्या-भोळ्या मुलीची भूमिका साकारणं ते धाकड सिनेमातील मोहक गुप्तहेरपर्यंत, ‘मणिकर्णिका’मधील देवी ते ‘चंद्रमुखी’तील राक्षसी भूमिका, ‘रज्जो’मधील शरीर विक्री करणारी महिला ते ‘थलाईवी’तील क्रांतिकारक नेत्यापर्यंत अनेक भूमिका केल्या आहेत.’

- Advertisement -

दुसरीकडे, सुप्रिया श्रीनेत यांनी स्पष्ट केले की, जो कोणी मला ओळखतो त्यांना माहीत असेल की मी कोणत्याही महिलेबद्दल असे कधीच बोलणार नाही. तथापि, एक बनावटखाते देखील आहे. ती व्यक्ती माझ्या नावाचा गैरवापर करत असल्याचे मला आढळले आहे. माझ्या नावानेही कुणीतरी ट्विटर वापरायला सुरुवात केली आहे. याबाबत मी तक्रार दाखल केली आहे. असे असतानाही भाजप नेत्यांनी सुप्रिया यांच्यावर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या, ‘कंगना रणौत कोण आहात हे प्रतिबिंबित करत नाही, परंतु तिने काय केले आहे आणि पुढे करण्यास सक्षम आहे हे दर्शवते. किंबहुना तुमच्यासारख्या सशक्त महिलांशी कसे वागावे हे त्यांना समजत नाही. तुम्ही विजयाकडे वाटचाल करा. तुमचा विजय होवो!’

कंगनाला मंडी लोकसभा मतदारसंघातून तिकीट 

हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने कंगना राणौतला तिकीट दिले आहे. कंगनाने मंडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे तिकीट मिळाल्याबद्दल भाजपचे आभार मानले आहेत. आपण भारतीय जनता पक्षाला नेहमीच पाठिंबा दिला होता, आता पक्षाने निवडणूक लढवण्याची संधी दिल्याने आपण पूर्ण झोकून देऊन काम करण्यास तयार असल्याचे त्या म्हणाल्या. कंगना रणौतने सोशल मीडियावर लिहिले की, ‘मी नेहमीच माझ्या प्रिय भारताला आणि भारतीय जनता पक्षाला, सर्वसामान्य भारतीयांचा पक्षाला बिनशर्त पाठिंबा देत आले आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने मला माझी जन्मभूमी मंडी येथून लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केले आहे. हायकमांडच्या या निर्णयाचे मी पालन करेन. अधिकृतपणे पक्षात सामील होण्यासाठी मी सन्मानित आणि उत्साहित आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Drugs Factory : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, सांगलीतील ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -