घरताज्या घडामोडीजाऊन रडत बस...कंगणाने वरूण गांधींना सुनावलं..

जाऊन रडत बस…कंगणाने वरूण गांधींना सुनावलं..

Subscribe

बॉलीवूड क्वीन कंगणा रणौत आणि वाद यांच अतूट नात आहे. याच कारणामुळे कंगणा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कंगणाने नुकतचं टाईम्स नाऊ समिट २०२१ मध्ये स्वातंत्र्यावर विधान केलं. १९४७ साली भारताला मिळालेलं स्वातंत्र्य भीक असून खरं स्वातंत्र २०१४ साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य तिने केले होते. यावर भाजपचे खासदार वरूण गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. पण गप बसेल ती कंगणा कसली. तिने लागलीच वरूण गांधी यांना लक्ष्य केलं .यात तिने वरूण गांधीना जा आणि रडत बस असं म्हटले आहे.

;

- Advertisement -

टाईम्स नाऊ समिट २०२१ या कार्यक्रमात कंगणाला आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी कंगणाने विविध विषयांवर मोकळेपणाने विचार मांडले. त्याचवेळी तिने ती खरी देशभक्त असल्याचंही म्हटलं. तसेच यावेळी तिने स्वातंत्र्यावर भाष्य़ केलं. भिकेत मिळालेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असत का असा सवाल करत तिने खरं स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाल्याचे सांगितले. यावरून अनेकांनी कंगणावर कडाडून टीका केली आहे. वरुण गांधींनीही यावरून टि्वटमध्ये कंगणाला खडे बोल सुनावले.

ते म्हणाले की कधी महात्मा गांधीजींच्या त्याग आणि तपस्येचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता शहीद मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंह ,चंद्रशेखर आजाद, नेताची सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली त्यांचा तिरस्कार. या विचारसरणीला वेड म्हणायचं की देशद्रोह ? वरूण गांधींच्या टि्वटवर शांत बसेल ती कंगणा कसली.

- Advertisement -

 

टि्वटरने तिचे अकाऊंटवरच बंदी घातल्याने तिने लगेचच इन्स्टावर गांधीच्या टि्वटचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्याबरोबर तिने तिचं उत्तरही दिलं. मी १८५७ सालच्या देशाच्या पहील्या स्वातंत्र्य संग्रामाचा उल्लेख केला होता. जो अयशस्वी झाला. त्यावेळी आपल्याला ब्रिटीशांची क्रूरता आणि अत्याचार सहन करावे लागले होते. त्यानंतर जवळपास १०० वर्षांनंतर गांधीनी भिक मागितल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. असं स्पष्ट करत कंगणाने जा आणि रडत बस आता असा उपहासात्मक टोलाही गांधींना लगावला. कंगणाच्या या विधानावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -