घरताज्या घडामोडीकन्हैया कुमारचं ठरलं, जिग्नेश मेवानीसह करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

कन्हैया कुमारचं ठरलं, जिग्नेश मेवानीसह करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

Subscribe

कन्हैया कुमारची तरुण वर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगली लोकप्रियता आहे.

जेएनयूएसयूचे माजी अध्यक्ष आणि सीपीआई नेता कन्हैया कुमारने काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या चर्चांना पुर्णविराम दिला आहे. येत्या मंगळवारी २८ सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. कन्हैया कुमारसोबत गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणीसुद्धा काँग्रेसचा हात हाती घेणार आहेत. काँग्रेस माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची कन्हैया कुमारने भेट घेतली होती. त्यानंतर कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर कन्हैया कुमार २८ सप्टेंबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. कन्हैया कुमार हे विद्यार्थी नेते म्हणून ओळख आहे. जिग्नेश मेवाणी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये गुप्त बैठकाही झाल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

गुजरात काँग्रेसमध्ये युवा तरुण प्रवेश करत असल्यामुळे काँग्रेस पुन्हा सुरळीत होईल का? हे पाहावं लागेल. कन्हैया कुमार आणि आमदार जिग्नेश मेवाणी हे दोन्ही चेहरे चांगले चर्चेत असलेले व्यक्ती असून मोठा जनाधार यांच्यापाठी आहे. जिग्नेश मेवाणी हे आमदार आहेत. तर कन्हैया कुमार कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली होती. यादरम्यान काही गुप्त बैठका घेण्यात आल्यामुळे दोघांच्याही प्रवेशाची चांगलीच चर्चा रंगली होती. अखेर या चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

- Advertisement -

काँग्रेस सध्या तळागाळात गेली असून दोन तरुण चेहरे मिळणार असल्यामुळे कँग्रेस पुर्वपदावर येण्याची शक्यता आहे. कन्हैया कुमार हे बिहारचे असल्यामुळे बिहारमध्ये आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे. आगामी निवडणुकीसाठी बिहारमधील काँग्रेसला मजबूत करण्यासाठी हायकमांड कामाला लागले आहे. यासाठी कन्हैया कुमारला काँग्रेसमध्ये घेण्यात ये आहे. कन्हैया कुमारची तरुण वर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगली लोकप्रियता आहे. कन्हैया कुमारचे मुद्दे विद्यार्थ्यांनमध्ये चर्चेचा विषय ठरत असतात. कन्हैया कुमारमुळे बिहारमध्ये तरुणांना काँग्रेसकडे वळवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

कन्हैया कुमारने २०१९मध्ये लोकसभा निवडणुकीला भाजप नेते गिरिराज सिंह यांच्याविरोधात निवडणूल लढवली होती. परंतु कन्हैया कुमार गिरीराज सिंह यांना पराभूत करण्यात अपयशी ठरले आहेत. काँग्रेसची विचारधारणा आहे की, काँग्रेसला बिहारमध्ये नव्या चेहऱ्याची गरज आहे. बिहार काँग्रेसचे नेते अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे की, कन्हैया कुमारच्या येण्याने काँग्रेसला फायदाच होईल. कारण कन्हैया कुमार आणि काँग्रेस एकाच मुद्यावर लढत आहे.


हेही वाचा : परीक्षेतील घोटाळ्याची CBI चौकशी करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु, दरेकरांचा इशारा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -