घरताज्या घडामोडीयमुना नदीत बोट उलटून 4 जणांचा मृत्यू; 35 जण बेपत्ता

यमुना नदीत बोट उलटून 4 जणांचा मृत्यू; 35 जण बेपत्ता

Subscribe

बांदा येथील मार्का घाटातून फतेहपूरला जाणारी बोट यमुना नदीत उलटल्याने 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या बोटीत सुमारे 50 लोक असून यामध्ये लहान मुलांसह 20 ते 25 महिलांचाही समावेश असल्याचे समजते.

बांदा येथील मार्का घाटातून फतेहपूरला जाणारी बोट यमुना नदीत उलटल्याने 4 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या बोटीत सुमारे 50 लोक असून यामध्ये लहान मुलांसह 20 ते 25 महिलांचाही समावेश असल्याचे समजते. या महिला रक्षाबंधनाला राखी बांधण्यासाठी आपल्या माहेरच्या घरी जात असल्याचे सांगितले जात आहे. गुरुवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. (kanpur city banda boat drown in yamuna river and many passengers are missing including women going for raksha bandhan vp96)

मिळालेल्या माहितीनुसार, बांदा जिल्ह्यातील मार्का घाट येथून फतेहपूरमधील कौहान जरौली येथे जाण्यासाठी काही लोक यमुना नदीमार्गे बोटीने प्रवास करत होते. या बोटीत 40 ते 50 जण होते. मार्का येथील रहिवासी बाबू निषाद यांचा मुलगा नानकू हा बोट चालवत होता. त्यावेळी ओढ्याच्या मधोमध येताच बोटीच्या वळणावळणाचा कठडा तुटल्याने पाणी भरू लागले. बोट बुडण्याचा धोका पाहून काही पोहणाऱ्यांनी आधीच नदीत उड्या मारल्या.

- Advertisement -

काहीवेळाने संपूर्ण बोट नदीत बुडाली आणि बोटीतील महिला व मुले लाटांच्या तडाख्यात बेपत्ता झाली. त्यावेळी नदीत बोट बुडत असल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर शर्तीच्या प्रयत्नांनी लोकांना वाचवण्यासाठी उपस्थित जीवरक्षख नदीत उतरले.

जवळपासच्या गावातील जीवरक्षकांनी बेपत्ता लोकांचा शोध सुरू केला आणि दोन महिला आणि एका मुलाचे मृतदेह बाहेर काढले आहेत. सध्या त्याची ओळख पटलेली नाही. माहितीनंतर जिल्हा दंडाधिकारी अनुराग पटेल घटनास्थळी पोहोचले आहेत. त्याचवेळी पोलीस दल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घाटावर पोहोचून जाळी लावून बचावकार्य सुरू केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आम्ही वाक्य पूर्ण करण्याच्या आत होते ‘ब्रेकिंग न्यूज’, सरन्यायाधीशांची माध्यमांवर टीका

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -