लग्न करुन नवरी – नवरदेव फसले; शेजारचे विचारतात कधी येणार?

लग्न करुन नवरी - नवरदेव चांगलेच फसल्याची घटना कानपुरमध्ये घडली आहे.

in Uttar Pradesh Muzaffarnagar mother-in-law got married son-in-law
अबब! सासूने पटवलं जावयाला, लेकीचा थयथयाट

लग्न करुन नवरी – नवरदेव चांगलेच फसल्याची घटना कानपुरमध्ये घडल्याचे समोर आले आहे. कानपुर नगरच्या चौबेपुर गावातील जवळच्या नगरमध्ये महबूब खान यांचे पुत्र मो. इम्तियाज यांचा नुकताच विवाह झाला होता. बिहारमधील बेगूसराय बलिया येतील फतेहपूर गावातील मोहम्मद. हमीद यांची भाची खुशबू खातून या तरुणीसोबत २१ मार्च रोजी विवाह केला. विवाहकरता नवऱ्याकडील सर्व नातेवाईक बिहारला गेली होती. विवाह झाला आणि नवऱ्याकडची माणसं २२ मार्चला कानपुरला निघणार होते. दुसऱ्या दिवशी वरात घरी येण्यासाठी निघण्याआधीच देशात लॉकडाऊनन लागू करण्यात आले. त्यामुळे नवरा – नवरीची वरात तिथेच अडकून पडली.

वाट पाहून नातेवाईक निघून गेले

नवरा – नवरीची वाट पाहणारी बहीण आफरीन सांगते की, ‘लग्नाच्या वेळी गावी नातेवाईक आले होते. ते सर्वचजण नवरा-नवरीची आतुरतेने वाट पाहत होते. पण, वरात लॉकडाऊनमध्ये अडकल्यामुळे येऊ शकली नाही. आता ४५ दिवस होत आले. पण अद्याप नवरा – नवरी घरी आलेले नाहीत. त्यामुळे वाट पाहून नातेवाईकही निघून गेले आहेत. तर शेजारचे दररोज घरी येऊन नवरा – नवरी केव्हा येणार’, अशी विचारणा करत आहेत.

करीम नगर येथे राहणारा चुलतभाऊ सगीर यांनी सांगितले की, ‘या कुटुंबासोबत एक बँड पथक देखील आहे. मात्र, लॉकडाऊमुळे ही वरात तिथेच फसली आहे. सर्वजण  लॉकडाऊनमध्ये अडकल्यामुळे ते दररोज फोनद्वारे संपर्क साधत आहेत. तसेच इम्तियाजच्या वडिलांनी खर्चासाठी म्हणून २० हजार रुपये नेले होते. मात्र, आता तेही संपले आहेत. दरम्यान, याबाबत गावातील सरपंचाना नवरा – नवरीसह नातेवाईकांना घरी आणण्याची सोय करण्याचे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – सुपर फ्लॉवर मून २०२० : आज यावर्षीचा शेवटचा सुपरमून दिसणार!