घरदेश-विदेशएका लग्नाची भन्नाट गोष्ट! ६० वर्षांचा नवरदेव आणि ५५ वर्षांची नवरी, लग्नात...

एका लग्नाची भन्नाट गोष्ट! ६० वर्षांचा नवरदेव आणि ५५ वर्षांची नवरी, लग्नात १३ वर्षाचा मुलगा वऱ्हाडी

Subscribe

आपल्या आई-वडिलांच्या लग्नाचे फोटो पाहताना कित्येक मुलं आपल्या आई-वडिलांना विचारताना दिसले असतील की, आम्ही कुठे होतो लग्नात? यावेळी बरेच कारणं देऊन आपल्या मुलाचा प्रश्न टाळल्याचे तुम्ही पाहिले असेल. परंतु, उन्नावमधील एका अनोख्या विवाहाची चांगलीच चर्चा होताना दिसतेय. या विवाह सोहळ्यात १३ वर्षांचा मुलगा वऱ्हाडी म्हणून त्याच्या पालकांच्या लग्नात उपस्थित राहिला होता. हा प्रकार उन्नावच्या गंजमुरादाबाद गावात, ६० वर्षांचा नवरदेव आणि ५५ वर्षाच्या नवऱ्या मुलीचे लग्न झाले आणि त्यांचा १३ वर्षाचा मुलगा वऱ्हाडीच्या रूपात लग्नाच्या मिरवणुकीत नाचताना दिसला.

असा घडला प्रकार

गंजमुरादाबाद बेहटा मुजावर पोलिस स्टेशन परिसरातील रसूलपूर रुरी गावात राहणाऱ्या नारायण आणि रामवतीची ही कहाणी आहे. असे सांगितले जाते की, साधारण पंधरा वर्षांपूर्वी नारायण आणि रामरती लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र होते. घरात एकत्र राहत असताना रामवतीने एका मुलाला जन्म दिला आणि त्याचे नाव अजय ठेवले. या जोडप्याने लाड करून आपल्या मुलाचे संगोपन केले. आज त्यांचे मूल १३ वर्षाचे होते तेव्हा त्याला अनेक गोष्टींची समज देखील आली होती. काही गावकऱ्यांच्या तोंडून त्याने आई आणि वडिलांचे लग्न न केल्याबद्दल ऐकले. यावर त्याने आधी रामवती व नंतर नारायण यांची विचारपूस केली. त्याचे म्हणणे ऐकून दोघांनाही उत्तर देता आले नाही, आणि हा विषय त्यांनी टाळला.

- Advertisement -

आपल्या मुलाने विचारलेल्या प्रश्नानंतर नारायण आणि रामवती बराच वेळ विचार करत राहिले. परंतु आता नारायण वयाच्या ६० व्या वर्षी पोहोचले होते आणि रामवती ५५ वर्षांचे होते. असे असतानाही त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. अखेर दोघांनीही आपल्या निर्णयाबद्दल नातेवाईकांना सांगितले आणि लग्नाची तयारी सुरू केली. या अनोख्या विवाह सोहळ्यात नारायण आणि रामवती यांचा मुलगा वऱ्हाडी म्हणून सहभागी झाला होता. सध्या या अनोख्या विवाहाची चर्चा होताना दिसतेय.


खिशात ऑक्सिजन बॉटल भरा अन् हव तिथे फिरा, IIT कानपूरचे संशोधन
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -