घरदेश-विदेशKanpur Clash : कानपूर हिंसाचारानंतर पोलीस अॅक्शन मोडवर; 40 जणांविरोधात FIR, 1000...

Kanpur Clash : कानपूर हिंसाचारानंतर पोलीस अॅक्शन मोडवर; 40 जणांविरोधात FIR, 1000 जण आरोपी म्हणून घोषित, 35 जणांना अटक

Subscribe

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांकडून कानपूर येथील घटनेची माहिती घेतली.

कानपूरच्या बेकनगंजमध्ये शुक्रवारी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी तीन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन एफआयआर पोलिसांनी दाखल केले आहेत तर तिसरा एफआयआर मारहाण आणि तोडफोड करणाऱ्या पीडितेच्या वतीने दाखल करण्यात आला आहे. 40 आरोपींच्या नावे FIR दाखल करण्यात आला आहे. तर 1000 अज्ञात लोकांनाही आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत 35 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींविरोधात गँगस्टर कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्यांची मालमत्ता जप्त करत त्यावर आता प्रशासनाकडून बुलडोझर फिरवला जाणार आहे.

हिंसाचारात 13 पोलीस कर्मचारी, 30 स्थानिक लोक जखमी

कानपूर हिंसाचारात आत्तापर्यंत 13 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची पोलीस आयुक्त आनंद प्रकाश तिवारी यांनी दिली आहे. या हिंसाचारात दोन्ही बाजूचे 30 जण जखमी झाले आहेत. तसेच अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यासोबत अनेक दुकानांमध्ये लूटमारही झाली आहे. पोलिसांनी दरोडा, मारहाण, दंगल यासह अनेक कलमांतर्गत FIR दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि व्हिडीओ फुटेजच्या माध्यमातून ओळखल्यानंतर 35 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान पोलीस अधिकारी वाहनांसह परिसरात फेऱ्या मारत आहेत.

- Advertisement -

दरम्यान परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची गस्ती वाढवण्यात आली आहे. एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने ही घटना अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस दलही तैनात करण्यात आले असून त्यात 12 कंपन्या आणि एक प्लाटून पीएसी यांचा समावेश आहे. याशिवाय सर्व डीएसपी, पोलिस आयुक्त, डीएम आणि विभागीय आयुक्त राजशेखर यतिमखाना पोलिस चौकीत तळ ठोकून आहेत. त्यांच्याकडून दंगल घडविणाऱ्यांची ओळख पटवली जात आहे. दरम्यान कानपूरचे पोलीस अधिकारी चोवीस तासकोणत्याही परिस्थितीत शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकार आणि पोलीस कोणत्याही परिस्थितीत शांतता आणि सुव्यवस्था बिघडू देणार नाहीत.

सीएम योगींनी कानपूर हिंसाचाराची घेतली माहिती

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी पोलीस आयुक्तांकडून कानपूर येथील घटनेची माहिती घेतली. यानंतर त्यांनी दोषींवर एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. यावर योगी म्हणाले की, कानपूरच्या घटनेत कोणतीही सवलत न देता कठोर कारवाई करा.

- Advertisement -

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा आज कानपूर दौरा

राष्ट्रपती रामनाथ कोविंद शुक्रवारी कानपूर येथील त्यांच्या मूळ गावी पोहोचले होते. आज सकाळी 11 वाजेपर्यंत ते कानपूरमध्ये असतील. आज ते मर्चंट चेंबरमध्ये व्यापाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सर्व बाजूंनी कडक कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी हिंसाचारग्रस्त भागाला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओवरून प्रत्येकी एका आरोपीची ओळख पटवली जात आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

कानपूर नगरमधील बेकनगंज पोलीस स्टेशन हद्दीतील नई सडक परिसरात शुक्रवारच्या नमाजानंतर काही लोकांनी तेथील दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला, त्याला दुसऱ्या बाजूच्या लोकांनी विरोध केला. यावरून आपापसात हाणामारी झाली, दगडफेकीची घटना घडली. या माहितीवरून पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलीस दलाने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आवश्यक बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली.


अंबानी ते अमिताभ बच्चन पितात या डेअरीचे दूध; एक लिटर दुधाची किंमत वाचून व्हाल थक्क

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -