घरदेश-विदेशGoodNews! देशात पहिल्यांदाच कानपूरमध्ये २ ते ६ वर्षातील ५ मुलांवर Covaxin चे...

GoodNews! देशात पहिल्यांदाच कानपूरमध्ये २ ते ६ वर्षातील ५ मुलांवर Covaxin चे ट्रायल

Subscribe

देशात कोरोना व्हायरस अटोक्यात आणण्यासाठी देशभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. अशातच लहान मुलांना कोरोना लस कधी मिळणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात आता लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरू झाली आहे. आतापर्यंत २ ते ६ वयोगटातील ५ मुलांना कोरोना लस देण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच २ वर्ष ८ महिन्यांच्या मुलीला लसीकरण करण्यात आले. कानपूर ग्रामीण भागात एका खासगी डॉक्टरांनी त्यांच्या मुलीला लसीच्या चाचणीसाठी लस दिली. या मुलांना लस देण्यापूर्वी त्यांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. कोव्हॅक्सिनच्या योजनेनुसार ही लस या मुलांना देण्यात आली आहे.

आतापर्यंत १२-१८ वर्ष वयोगटातील २० मुलांना लस दिली गेली आहे, ६ ते १२ वर्षांच्या २० मुलांना देखील डोस देण्यात आला आहे आणि २ ते ६ वर्षांच्या पाच मुलांना लस देण्यात आली आहे. ही लस दिल्यानंतर सर्व मुलांची प्रकृती ठीक असून त्यांना कोणताही त्रास झाला नसल्याचे कानपूरचे डॉक्टर जे एस कुशवाह यांनी सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानेही लहान मुलांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे यासाठी कोव्हॅक्सिनच्या लसीची चाचणी जुलैपासून सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. लसी विकसित करणाऱ्या अमेरिकेची कंपनी नोव्हावॅक्सने अमेरिकेतील मुलांवरील चाचण्यांनंतर असे सांगितले की, अमेरिकेच्या मेक्सिको राज्यातील ११९ शहरांमधील फेज-३ चाचणीचा परिणाम चांगला असून त्याती टक्केवारी ९०.४ टक्के आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला सप्टेंबरपर्यंत मान्यता देण्यात येणार असल्याचे दिल्ली एम्स रुग्णालयाचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. यासह, फायझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ते देखील मुलांना लससाठी पर्याय ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले.


COVID-19 vaccines: Pfizer, Moderna लस घेतल्यानंतर हृदयविकाराचा धोका! अमेरिकेने घेतला आढावा
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -