गरीब माणसाकडे वकिलाला द्यायला पैसे नसतील तर.., कपिल सिब्बलांची न्यायव्यवस्थेवर टीका

देशपातळीवर विविध प्रकारच्या मुद्द्यांवरून सातत्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. अशातच काँग्रेसचे माजी नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ खासदार कपिल सिब्बल यांनी मोदी सरकारवर आरोप करत न्यायव्यवस्थेवरही टीका केली आहे.

गरीब माणसाकडे वकिलाला द्यायला पैसे नसतील, तर तो न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात येऊ शकत नाही, असा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. सध्या जगभरात मोठ्या प्रमाणात धर्माचा वापर शस्त्र म्हणून करण्यात येत आहे. भारत हे एक त्याचे उत्तम उदाहरण आहे, असं सिब्बल म्हणाले. दुसरीकडे देशातील बहुसंख्य जनता घाबरलेली आहे. ते मानसिकदृष्ट्या खचले आहेत. समाजात पसरत असलेल्या द्वेषाबाबत काय करायचे?, असा प्रश्न सिब्बल यांनी उपस्थित केला.

भारतात ज्या पद्धतीने द्वेषाचे राजकारण केले जात आहे. ते एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांकडून केले जात आहे. संबंधित लोकांवर पोलिसांकडूनही काहीही केले जात नाहीये. जे द्वेषपूर्ण भाषणं करतात त्यांच्यावर कारवाई सुद्धा होत नाहीये. त्यामुळे अशा लोकांना पुन्हा द्वेषपूर्ण भाषणं करायला प्रोत्साहन मिळत आहे, असं सिब्बल म्हणाले.


हेही वाचा : दापोली समुद्र किनाऱ्यावर सापडलेली ‘ती’ लाइफ क्राफ्ट, तटरक्षक दलाचा खुलासा