घरदेश-विदेशपाकिस्तानच्या कराची पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला; स्फोटात 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी

पाकिस्तानच्या कराची पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला; स्फोटात 6 जणांचा मृत्यू, 12 जखमी

Subscribe

पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कराची शहरातील पोलीस मुख्यालयावर शुक्रवारी दहशतवादी हल्ला झाला आहे. आठ ते दहा दहशतवाद्यांनी कराची पोलीस मुख्यालयात शिरून अंधाधुद गोळीबार सुरु केला. यावेळी सुरक्षा कर्मचारी आणि दहशवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले आहे. तहरीक- ए- तालिबान पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 7.10 वाजता शाहराह-ए-फैसल या भागात हा दहशतवादी हल्ला झाला, यानंतर रात्री 10.50 पर्यंत सुरक्षा दल आणि दहशवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. कराची पोलीस मुख्यालयात घुसलेल्या दहशतवाद्यांमध्ये मोठाप्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा होता. या दहशवाद्यांकडे हँडग्रेनेड आणि ऑटोमॅटिक गन सापजडल्या आहेत. ज्यांच्या मदतीने ते सतत हल्ला करत होते. दरम्यान कराची पोलीस प्रवक्त्यांनी कराची पोलिस प्रमुखांच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला याची पुष्टी केली आहे. कराची पोलीस प्रमुख जावेद ओढो यांनी ट्विट करत सांगितले की, पाकिस्तान सुरक्षा दलांनी दहशवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुमारे चार तासांच्या कारवाईनंतर कायद्याची अंमलबजावणी करणार्‍यांनी शहर पोलिस प्रमुखांचे पाच मजली कार्यालय रिकामे केले.

- Advertisement -

सिंध सरकारचे प्रवक्ते मुर्तझा वहाब यांनी ट्विट करत सांगितले की, दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस मुख्यालयाची इमारत रिकामी करण्यात आली आहे. या हल्ल्यात पाच दहशतवादी मारले गेले आहेत. तर दोन पोलिस अधिकाऱ्यांसह चार जणांचाही मृत्यू झाला. तसेच सुरक्षा कर्मचाऱ्यांसह 14 जण जखमी झाले आहेत.

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम काही दहशतवादी पोलीस मुख्यालयाच्या इमारतीच्या मागच्या बाजूने घुसले, तर दोन दहशतवाद्यांनी पोलिसांच्या गणवेशात मुख्य गेटमधून प्रवेश केला. दहशतवाद्यांनी आधी कराची पोलीस प्रमुख कार्यालयाच्या इमारतीच्या मुख्य आवारात सहा हातबॉम्ब फेकले आणि नंतर आवारात प्रवेश केला.
दरम्यान पोलिसांना आता दोन कार देखील आढळल्या ज्यांचे दरवाजे उघडे होते. यातील एक कार इमारतीच्या मागील प्रवेशद्वाराजवळ आणि दुसरी समोर पार्क केलेली, या कारमधूनचं सकाळी 7:10 च्या सुमारास दहशतवादी आले होते.

या हल्ल्यानंतर आता पाकिस्तान रेंजर्स आणि पोलीस दलाने एआयजी कार्यालय परिसरात मोठी नाकाबंदी केली आहे. ठिकठिकाणी सिंध पोलीस आणि पाकिस्तान रेंजर्स मोठ्या संख्येने तैनात केले आहेत. तसेच क्विक रिस्पॉन्स फोर्सनेही घटनास्थळी दाकल होत संपूर्ण परिसराला घेराव घातला आहे. कराची पोलीस मुख्यालाय हे विमानतळाकडे जाणाऱ्या शहाराच्या मुख्य रस्त्यावर आहे. त्यामुळे याठिकाणी लोकांची गर्दी देखील मोठ्याप्रमाणात असते.


निवडणूक आयोगाने…; उद्धव ठाकरे यांचा घाणाघात

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -