घरताज्या घडामोडीकराटे चॅम्पियन पत्नीने पतीला धू धू धूतले, मला बायकोपासून वाचवा, पतीचा टाहो

कराटे चॅम्पियन पत्नीने पतीला धू धू धूतले, मला बायकोपासून वाचवा, पतीचा टाहो

Subscribe

घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण मिळावे यासाठी कायदे बनवण्यात आले आहेत. यामुळे महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवू शकतात. पण पुरुषांसाठी कायद्यात अशी विशेष तरतुदच नसल्याने दिल्लीतील एका पीडित पतीने मदतीसाठी टाहो फोडला आहे. दीपक साहनी असे त्याचे नाव असून कराटे चॅम्पियन पत्नीने त्याला धू धू धुतले असून त्याचा पायच फ्रॅक्चर केला आहे. यामुळे मला माझ्या पत्नीपासून वाचवा असे सांगत दिपकने पोलिसांकडे मदतीची याचना केली आहे.

दिल्ली एनसीआरमधील नोएडा येथे राहणाऱ्या दिपकची सोशल मीडियावर एका तरुणीबरोबर मैत्री झाली होती. तरुणी कराटे चॅम्पियन होती. त्यामुळे दिपकला तिचे विशेष कौतुक होते. गेल्या वर्षी २०१९ साली मे महिन्यात दोघांनी लग्न केले. पण नंतर मात्र दोघांमध्ये कुरबुरी वाढल्या. त्यानंतर मात्र पत्नीने आपले कराटेचे कौशल्य दिपकवर वापरण्यास सुरुवात केली. ती त्याला उटसूठ बदडू लागली. यामुळे अनेकवेळा दिपक जखमीही झाला. पण पत्नीवरील प्रेमापोटी त्याने तिची तक्रार केली नाही. मात्र शनिवारी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर मात्र पत्नीने दिपकला पुन्हा बेदम मारहाण केली यात दिपकचा पाय फ्रॅक्चर झाला. संपूर्ण रात्र तो वेदनेने तळमळत होता. पण पत्नीला त्याची दया आली नाही. रविवारी सकाळी संधी साधून दिपक कसाबसा घराबाहेर पडला व त्याने वडिलांना फोन केला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -