Homeदेश-विदेशKareena Kapoor : कुमार विश्वासांच्या टीकेवरून यूपीत रंगले राजकारण, सपा आणि भाजपा...

Kareena Kapoor : कुमार विश्वासांच्या टीकेवरून यूपीत रंगले राजकारण, सपा आणि भाजपा आमनेसामने

Subscribe

अभिनेत्री करीना कपूर हिच्याबद्दल कुमार विश्वास यांनी केलेल्या वक्तव्यावर समाजवादी पार्टीने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे तर, भाजपाने त्यांचे समर्थन केले आहे.

(Kareena Kapoor) लखनऊ : प्रसिद्ध हिंदी कवी कुमार विश्वास यांनी अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांच्या मुलाच्या नावावरून केलेल्या टीकेमुळे उत्तर प्रदेशात राजकारण रंगले आहे. कुमार विश्वास यांच्या वक्तव्यावर समाजवादी पार्टीने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे तर, भाजपाने त्यांचे समर्थन केले आहे. (SP and BJP face to face in UP over criticism of Kumar Vishwas)

समाजवादी पार्टीचे उदयवीर सिंह यांनी कुमार विश्वास यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कुमार विश्वास हे भाजपाच्या राजकारणातील जहाल शाखेचे सदस्य आहेत. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी ते वाट्टेल ते बोलत आहेत. असे कोणाला बोलणे शोभत नाही, अतिशय हीन गोष्ट आहे. राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या सिनेतारकांच्या मुलांबद्दल टिप्पणी केली जात आहे, अशा शब्दांत उदयवीर सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा – Adani Bribery Case : अदानी लाचप्रकरणात नवे अपडेट, अमेरिकेच्या कोर्टाने घेतला हा निर्णय

तर दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे मंत्री दयाशंकर सिंह यांनी कुमार विश्वास यांचे समर्थन केले आहे. तैमूरलंग हा आक्रमणकारी होता. त्याने हजारो-लाखो लोकांना मारले. त्यानेच देशाला लुटले. देशाची लूट करणाऱ्या आक्रमणकर्त्याचे नाव आपल्या मुलाला देणे योग्य नाही, असे कुमार विश्वास यांनी एवढेच म्हटले आहे, असे दयाशंकर सिंह म्हणाले.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील एका कार्यक्रमात कुमार विश्वास यांनी करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्यावर हल्लाबोल केला. देशाला काय हवे आहे, हे मायानगरीतील लोकांना जाणून घ्यावे लागेल. लोकप्रियता आम्ही मिळवून देणार, तिकीट आम्ही खरेदी करणार, पैसे आम्ही देणार, तुम्हाला हीरो-हीरोइन आम्ही बनवणार आणि तुमच्या तिसऱ्या लग्नानंतर जे बाळ जन्माला येईल, त्याचे नाव बाहेरून आलेल्या आक्रमणकाऱ्याचे ठेवणार… हे चालणार नाही, असे त्यांनी सुनावले आहे.

ज्या लंगड्या व्यक्तीने बाहेरून येऊन भारतातील माता-भगिनींवर अत्याचार केला, त्याच लफंग्या व्यक्तीचे नाव तुम्हाला आपल्या मुलासाठी मिळाले? असा सवाल करून कुमार विश्वास म्हणाले, आता त्याला हीरो बनवायचा प्रयत्न केला तर त्याला खलनायकही होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवा.

हेही वाचा – Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यात भाविकांसाठी विशेष सुरक्षाव्यवस्था; फायर फायटिंग बोट घाटांवर तैनात

Manoj Joshi
Manoj Joshi
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.