घरदेश-विदेशKargil Vijay Diwas 2022: कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो? काय...

Kargil Vijay Diwas 2022: कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो? काय आहे इतिहास

Subscribe

ऑपरेशन विजयमध्ये अनेक भारतीय सैनिक शहीद झाले होते. परंतु, ते एक इंच देखील आपल्या जागेवरून मागे हटले नाहीत. कारगिल विजय दिवसच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी वीर जवानांची आठवण काढत त्यांच्या वीरतेच आणि साहसाच्या गोष्टी प्रत्येत ठिकाणी सांगितल्या जातात.

देशभरामध्ये आजच्या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. आजपासून २३ वर्षांपूर्वी २६ जुलै रोजी भारताच्या वीर जवानांनी देशासाठी आपली जीवाची बाजी मारून पाकिस्तानच्या घुसखोरांना आणि सैनिकांना कारगिलपासून हकलावून लावले होते. या खास दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी २६ जुलै रोजी वीरगति प्राप्त झालेल्या वीर जवानांच्या बलिदानची आठवण काढत विजय दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस ऑपरेशन विजयच्या सफलतेचे प्रतीत मानले जाते. १९९९ साली भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेलं युद्ध मे ते जुलै या काळात झालं होतं.

ऑपरेशन विजयमध्ये अनेक भारतीय सैनिक शहीद झाले होते. परंतु, ते एक इंच देखील आपल्या जागेवरून मागे हटले नाहीत. कारगिल विजय दिवसच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी वीर जवानांची आठवण काढत त्यांच्या वीरतेच आणि साहसाच्या गोष्टी प्रत्येत ठिकाणी सांगितल्या जातात.

- Advertisement -

कारगिल युद्धाचा इतिहास
१९७२ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर दोन्ही देशांमध्ये अनेक युद्धे झाली. १९९८ मध्ये दोन्ही देशांनी अणुचाचण्या घेतल्या होत्या. लहोरमधील घोषणेत काश्मीर समस्येवर शांततापूर्ण उपाय काढण्याचे आश्वासन दिले होते. ज्यावर समंती देत भारत-पाकिस्तानने फेब्रुवारी १९९९ मध्ये स्वाक्षरी देखील केली होती. मात्र, तरीही पाकिस्तानने नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती. या घुसखोरीला ऑपरेशन बदर असं नाव देण्यात आलं होतं. यालाचं प्रत्युत्तर देत भारत सरकारने या घुसखोरीला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन विजय सुरू केलं. मे ते जुलै दरम्यान चालू असलेल्या या युद्धात २६ जुलै रोजी अखेर भारताचा विजय झाला. याचीच आठवण म्हणून कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -