महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न विषय संपलाय एक इंचही जमीन देणार नाही- बोम्मई

Basavaraj Bommai Reaction on maharashtra karnataka border dispute issue
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न अस्तित्वातच नाही; बसवराज बोम्मई यांचा मोठा दावा

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न हा विषय संपलेला असून महाराष्ट्रातील राजकारणात जेव्हा अडचणी येतात तेव्हा महाराष्ट्रातील नेते सीमाप्रश्न उचलून धरतात. आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ही प्रकरणे पेटते ठेवतात. असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे. बोम्मई यांच्या या आरोपांनतर महाराष्ट्रातील नेते यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.

विधानसभेत समाज कल्याण खात्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर बोम्मई यांनी हे विधान केले आहे. यावेळी बोम्मई म्हणाले की सीमाप्रश्नबाबात यापूर्वी निर्णय झाला आहे. कर्नाटकची एक इंच जमिनीही महाराष्ट्राला देणार नाहीये. पण महाराष्ट्रातील राजकारणात जेव्ह अस्वस्था होते. तेव्हा आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाषा आणि सीमाप्रश्न असे वादग्रस्त विषय खालच्या पातळीवर जात राजकारणी उचलतात. पण आता हे सगळं सोडलं पाहीजे. अनेक कन्नड बहुभाषिक महाराष्ट्रात गेले आहेत. तो भाग कसा कर्नाटकला परत मिळेल याबाबत विचार करत असल्याचे बोम्मई यांनी सांगितले. काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा भागातील मराठी भाषिकांच्या आंदोलनाला महाराष्ट्राचा पाठींबा राहील असे म्हटले होते. यावर बोलताना बोम्मई यांनी थेट महाराष्ट्र सरकारलाच लक्ष्य केलं.