घरताज्या घडामोडीकर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णालयात दाखल

Subscribe

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत येडियुरप्पा यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्लानुसार रुग्णालयात भरती केले गेले आहे. ७८ वर्षीय येडियुरप्पा दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यापूर्वी त्यांना गेल्यावर्षी २ ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यासोबत त्यांच्या मुलगीला देखील कोरोना संसर्ग झाला होता.

दरम्यान येडियुरप्पा ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘मला सौम्य ताप होता, ज्यानंतर मी कोरोना चाचणी केली आणि याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मी आता ठिक आहे, डॉक्टरांच्या सल्लानुसार रुग्णालयात दाखल केलं गेलं आहे. अलीकडेच माझ्या संपर्कात आलेल्यांना विनंती करतो की, सावध राहा आणि स्वतः क्वारंटाईन राहा.’

- Advertisement -

दरम्यान देशात दररोज होण्याचा नव्या कोरोना रुग्णांच्या नोंदणी पैकी ७९.१० टक्के केसेस १० राज्यांमध्ये आहे. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. देशात आज २ लाख १७ हजार ३५३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. महाराष्ट्रात सर्वाधिक ६१ हजार ६९५ रुग्ण आढळले आहेत. यानंतर उत्तर प्रदेशमध्ये २२ हजार ३३९ रुग्ण आणि दिल्लीत १६ हजार ६९९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कच्चा मालाच्या निर्यातीवरील बंदी उठवा, अदर पूनावालांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विनंती


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -