घरताज्या घडामोडीKarnataka CM: शपथ घेताच सिद्धरामय्यांचा गृहिणींना दिलासा, काढला 'हा' आदेश

Karnataka CM: शपथ घेताच सिद्धरामय्यांचा गृहिणींना दिलासा, काढला ‘हा’ आदेश

Subscribe

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी ८ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपत घेतली. २२४ सदस्यांच्या विधानसभेत १३५ जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वात कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठकही झाली. मात्र, या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पहिला आदेश काढला. या आदेशामुळे गृहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

कर्नाटक सरकारचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिद्धरामय्या यांनी गृहलक्ष्मी योजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. तर या योजनेंतर्गत कर्नाटकातील प्रत्येक महिला कुटुंबप्रमुखाला दरमहा २ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

- Advertisement -

काय आहेत जाहिरनाम्यातील पाच घोषणा?

१) गृहलक्ष्मी योजना – प्रत्येक कुटुंबप्रमुखाला दरमहा 2000 रुपये आर्थिक मदत देणार

२) गृहज्योती योजना – प्रत्येक कुटुंबाला दरमला २०० युनिट मोफत वीज देणार

- Advertisement -

३) युवानिधी योजना – बेरोजगार पदवीधरांना (१८ ते २५ वयोगट) दरमहा ३००० रुपये तर डिप्लोमाधारक बेरोजगाराला दरमला १५०० रुपये देणार

४) शक्ती योजना – सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास

५) अन्न भाग्य योजना – दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला दरमहा १० किलो तांदूळ देणार

आम्ही निवडणूक जाहिरनाम्यात जनतेला पाच वचन दिले होते. या पाच वचनांचं पालन करण्याचे आदेश पहिल्या कॅबिनेट बैठकीनंतर देण्यात आले आहेत. या सर्व योजना पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लागू होतील, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. परंतु मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज पाच मोठ्या घोषणा केल्या असून त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे.

या शपथविधी सोहळ्याला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, जम्मू-काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती, यांनी बेंगळुरू येथे नवनिर्वाचित कर्नाटक सरकारच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. विरोधी पक्षातील नेत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने यावेळी विरोधकांची एकजूट दिसून आली.


हेही वाचा : Karnataka CM : सिद्धरामय्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री; डी.के. शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -