Video : रमचा पेग मारा, अंडी खा कोरोनाला पळवा- काँग्रेस नेत्याचा अजब सल्ला!

‘रमचा पेग मारा, अंडी खा कोरोनाला’ असा अजब सल्ला तुम्हाला कोणी दिला तर. या कोरोनाच्याकाळात असे अनेक सल्ले देणारे पुढे येत आहेत. कोरोना महामारी विरोधात जग लढत आहे. जगभरात सर्व वैज्ञानिक आणि संशोधक या विषाणूवर लस शोधण्यासाठी दिवस- रात्र झटत आहेत. काही ठिकाणी तर मिळालेल्या लसीची मानवी चाचणी सुरू आहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत कोरोनावर लस मिळण्याची शक्यता वैज्ञानिकाकडून व्यक्त होत आहे. या परिस्थीतीत अनेकजण वेगवेगळे उपाय कोरोनावर सांगत आहेत. काँग्रेस नेत्यानं कोरोनावर असाच एक देशी उपाय शोधला असून कोरोना बरा होतो असा दावाही केला आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मगळुरूमधील उल्लाल शहरातील काँग्रेस नेता रविचंद्र गट्टी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत गट्टी यांनी कोरोनावरील देशी उपचार सांगितला आहे. ते म्हणतात की, रम आणि दोन तळलेली अंड्याचं सेवन केल्यास कोरोनाचा पराभव केला जाऊ शकतो.

व्हायरल व्हिडिओमध्ये रविचंद्र गट्टी कोरोनाला पळवण्याचं औषधं सांगत आहेत. ते म्हणतात की, ९० मिली रममध्ये एक चमचा काळी मिर्ची टाका. त्यानंतर त्यांच मिश्रण चांगल्या पद्धतीने करा आणि प्या. त्यासोबत दोन अंड्यांचा ऑमलेट किंवा दोन फ्राय अंडी खा.’ कोरोनासोबत लढण्यासठी गट्टी यांनी हा देशी फॉर्मुला सांगितला आहे.

गट्टी यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. एक यूजर्सने लिहलेय की, कोरोना मरेल किंवा नाही, पण अंडे खाल्ले म्हणून आई नक्की मारेल.


हे ही वाचा – अमानुषपणाचा कळस! माकडाला काळे फासून काठीने बडवले, व्हिडीओ व्हायरल!