घरकर्नाटक विधानसभा निवडणूक २०२३कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचा 'हा' आहे HERO; वाचा सविस्तर

कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचा ‘हा’ आहे HERO; वाचा सविस्तर

Subscribe

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बहुमतांनी विजय झाला आहे. भाजपाला सत्तेवरून खाली खेचत काँग्रेसने कर्नाटकात आपला झेंडा फडकावला. काँग्रेसच्या या विजयाची देशभरात चर्चा रंगली आहे. मात्र काँग्रेसचा विजय कसा झाला? कोणता प्रचार? कोणता नेता? कोणता कार्यकर्ता प्रभावी ठरला असे एकनाएक अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बहुमतांनी विजय झाला आहे. भाजपाला सत्तेवरून खाली खेचत काँग्रेसने कर्नाटकात आपला झेंडा फडकावला. काँग्रेसच्या या विजयाची देशभरात चर्चा रंगली आहे. मात्र काँग्रेसचा विजय कसा झाला? कोणता प्रचार? कोणता नेता? कोणता कार्यकर्ता प्रभावी ठरला असे एकनाएक अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परंतु, कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयाचा मानकरी सुनील कानुगोलू ठरला. सुनील कानुगोलू याने संपूर्ण निवडणुकीदरम्यान जनतेशी विस्तृत आणि तपशीलवार संपर्क साधला. त्यासाठी त्यांनी रणनिती आखली. (karnataka election 2023 assembly results sunil kanugolu major strategists for congress in the maharashtra)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे (Karnataka Election 2023) निकाल समोर आले आहेत. कर्नाटकात (Karnataka) काँग्रेसनं बाजी मारली असून भाजपाचा (BJP) राज्यातून सुफडासाफ केला आहे. या विजयानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाची लाट असतानाच, त्यांच्यात या विजयाचं श्रेय वाटून घेण्यासाठी चढाओढही सुरू आहे. काँग्रेसच्या विजयाचे मानकरी अनेक आहेत. पण ज्याच्या बाजूने सर्व एकमतानं उभे राहतील. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयासाठी रणनीती बनवणाऱ्या आणि या निकालाची पटकथा लिहिणारं ते नाव म्हणजे सुनील कानुगोलू.

- Advertisement -

सुनील कानुगोलू काँग्रेसचे मुख्य रणनीतिकार

कर्नाटकातील काँग्रेसच्या प्रमुख रणनीतीकारांपैकी सुनील कानुगोलू हे एक आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी जनतेशी विस्तृत आणि तपशीलवार संपर्क साधला. त्यासाठी त्यांनी रणनिती आखली होती. त्यानुसार, लोकांची मत जाणून घेत त्यांना आपल्या बाजूने वळवण्याची जबाबदारी सुनील कानुगोलू यांच्यावर होती. जबाबदारी कालच्या निकालानंतर त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्याचे स्पष्ट झाले.

- Advertisement -

काँग्रेसच्या विजयासाठी सुनील कानुगोलू यांनी रणनिती आखली होती. यासाठी त्यांनी प्रचाराच्या नवनवीन पद्धती शोधून काढल्या होत्या. लोकांची नाडी जाणून घेण्यासाठी वेगवेगळी सर्वेक्षणे केली होती.

कोण आहेत सुनील कानुगोलू?

  • निवडणूक रणनितीकार म्हणून सुनील कानुगोलू यांना गेल्या वर्षी मार्चमध्ये काँग्रेसने पक्षात स्थान दिले.
  • काँग्रेसने गतवर्षी मे महिन्यात 2024 साठी टास्क फोर्सची स्थापना केली.
  • यामध्ये निवडणूक रणनीतीकार सुनील कानुगोलू यांचा सदस्य म्हणून समावेश आहे.
  • सुनील कानुगोलू यांनी यापूर्वी डीएमके, एआयएडीएमके आणि भाजपासोबतही काम केले.
  • सुनील कानुगोलू यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपसाठी, 2019 च्या संसदीय निवडणुकीत DMK आणि 2021 च्या विधानसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये AIADMK साठी निवडणूक रणनिती तयार केली.
  • माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या अनुपस्थितीत त्यांनी AIADMK साठी रणनिती आखली आणि पक्षानं चमकदार कामगिरी केली, तसेच पक्षाच्या रणनितीला चालना देण्याचे श्रेय त्यांना जाते.
  • सुनील कानुगोलू यांनी 2014च्या आधी प्रशांत किशोर यांच्यासोबतही काम केले होते.
  • मॅकिन्से यांचे पूर्व सल्लागार सुनील कानुगोलू हे 2014 मध्ये नरेंद्र मोदींच्या निवडणूक प्रचाराचे प्रमुख घटक होते.
  • त्यांनी भाजपच्या असोसिएशन ऑफ बिलियन माइंड्स (ABM) चे प्रमुख म्हणून काम केले.
  • त्यांनी एबीएमचं नेतृत्व केलं आणि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधील भाजपच्या निवडणूक प्रचारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

कर्नाटक विजयानंतर नवीन जबाबदारी

  • तेलंगणातही काँग्रेसची सत्ता आणून देण्याचे काम सुनील यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे समजते.
  • राजस्थान आणि छत्तीसगडमधील आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान पक्षासमोर आहे, त्याची जबाबदारीही सुनील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

हेही वाचा – संजय राऊत यांनी आपल्या उंची एवढेच बोलावे; आशिष शेलारांचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -