
कॉकपिटच्या खिडकीवर गरुडाने धडक दिल्याने काँग्रेस कर्नाटक युनिटचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या हेलिकॉप्टरचे मंगळवारी दुपारी एचएएल विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. काँग्रेस नेते कोलार जिल्ह्यातील मुलबागल येथे एका जाहीर सभेसाठी जात होते.( Karnataka Election: Helicopter accident of Congress State President DK Shivakumar emergency landing )
शिवकुमार यांच्या जवळच्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, हेलिकॉप्टरने बेंगळुरूच्या जक्कूर विमानतळावरून उड्डाण केले होते, परंतु त्याला गरुडाने धडक दिली. त्यामुळे हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.
कॅमेरामनला किरकोळ दुखापत
या धडकेत काचेचे तुकडे झाले. हेलिकॉप्टरचे एचएएल विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. शिवकुमार आणि पायलट शिवाय कन्नड वृत्तवाहिनीचे पत्रकार जे त्यांची मुलाखत घेत होते ते देखील हेलिकॉप्टरमध्ये होते. या घटनेत त्यांचा कॅमेरामन किरकोळ जखमी झाला. शिवकुमार, चालक दल आणि हेलिकॉप्टरमधील इतर सर्वजण सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांचे हेलिकॉप्टर होस्कोटेजवळ गरुडाला धडकले. या अपघातात डीके शिवकुमार यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.
( हेही वाचा: फाशीच्या शिक्षेचा समिती घेणार निर्णय; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती )
Karnataka Congress president DK Shivakumar's helicopter was hit by an eagle near Hosakote. He was on his way to Mulabagilu for an election rally. His camera person received minor injuries during the incident. pic.twitter.com/U6MEfu5ek9
— ANI (@ANI) May 2, 2023
शिवकुमार यांनी ट्वीट करत दिली माहिती
डीके शिवकुमार कोलार जिल्ह्यातील मुलबागल येथे जाहीर सभेसाठी जात होते. या घटनेनंतर शिवकुमार यांनी ट्वीटरवरुन घटनेची माहिती दिल. मुलबागलला जात असताना आमच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. त्यात आम्ही थोडक्यात बचावलो आहोत. सर्व लोकांच्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद, मी सुरक्षित आहे. इमजन्सी लॅंडिंगसाठी त्वरित प्रतिसाद दिल्याबद्दल मी वैमानिकांचे आभार मानतो. आता रस्त्याने मुलबागलला जात आहे, असे ट्वीट त्यांनी केले.
कर्नाटक निवडणूक
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी फक्त एक आठवडा शिल्लक आहे. 10 मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे. कर्नाटक निवडणुकीत 2 हजार 613 उमेदवारांपैकी 2 हजार 427 पुरुष, 184 महिला आणि 2 इतर आहेत. भाजपकडून 224, काँग्रेसकडून 223, जेडीएसचे 207, आम आदमी पार्टीचे 209, बसपचे 133, 8 जेडीयू आणि 918 अपक्ष उमेदवार आहेत.